सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती चेतन भंडारी यांनी मित्रपरिवार व आप्तेष्ट यांच्यासोबत केला सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांच्या विजयाचा जल्लोष ..
विकास हवा तर चेहरा नवा हे उद्दिष्ट घेऊन महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावून सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांना निवडून आणण्याकरिता खूप मेहनत घेतली होती आणि मागील कित्येक वर्षांपासून बाळ्या मामा हे लोकसभा मतदारसंघातील जनतेच्या संपर्कात होतेच तसेच त्यांचे सामाजिक कार्य व अडीअडचणीला नागरिकांना मदत करण्याची वृत्ती याचा फायदा सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांना झाला.
निवडणुकीच्या निकालाचे उत्साह भिवंडी लोकसभा क्षेत्राच्या प्रत्येक ठिकाणी करण्यात येत असून कल्याण पश्चिम येथे सुद्धा सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती चेतन भंडारी यांनी त्यांच्या मित्रपरिवार व आप्तेष्ट यांच्या समवेत भव्य आतिषबाजी करून व लाडू वाटून विजयी जल्लोष साजरा करण्यात आला.
No comments:
Post a Comment