Wednesday 5 June 2024

भिवंडी लोकसभेत बाळ्या मामा म्हात्रे यांनी केला कपिल पाटील यांचा दारुण पराभव, मामा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव !!

भिवंडी लोकसभेत बाळ्या मामा म्हात्रे यांनी केला कपिल पाटील यांचा दारुण पराभव, मामा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव !!

नवनिर्वाचित खासदार मा. श्री.सुरेश गोपीनाथ म्हात्रे ऊर्फ बाळ्या मामा यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना कोपर गावातील ज्येष्ट पत्रकार श्री.अरुण पाटील व शाखा प्रमुख  (ऊबाठा) श्री.राजन पाटील

भिवंडी, दिं,५, अरुण पाटील (कोपर) :
      लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून भिवंडी मतदारसंघात महाविकास आघाडीचे बाळ्या मामा ऊर्फ सुरेश गोपीनाथ म्हात्रे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या कपिल पाटील यांचा ७९ हजार ९१६  मतांनी  दारुण पराभव केला आहे.मात्र पार पडलेल्या मतदाना नंतर आपण मोठया फरकाने निवडून येऊ असे कपिल पाटील हे आपल्या समर्थकांना सांगत होते. मात्र नाराज मतदार राज्याने कपिल पाटील याना नापसंती दाखवली.

.                                        जेष्ठ पत्रकार अरुण पाटील 

      माजी खासदार कपिल पाटील यांनी आपल्या दहा वर्षाच्या कर्यकिर्तीत मतदार राजाला दुखवन्याचेच कार्य जास्त प्रमाणावर केल्याने आगरी, कुणबी, मुस्लिम व इतर धर्मीय मतदार राजा नाराज असल्याने त्याचा फटका पाटील याना जास्त बसला असावा. मुख्य म्हणजे कपिल पाटील यांच्याच हायवे - दिवे (अंजुर दिवे) गावातून शेतकरी संघटने कडून व मतदारांकडून त्यांना मोठ्या प्रमाणावर विरोध असल्याने त्याचा परिणाम मतदानावर झाला असल्याचे जाणकार मतदारांकडून बोलले जात आहे.
      कपिल पाटील यांनी आपल्या मतदार क्षेत्रात कोणत्याही प्रकारे रोजगार, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, दर्जेदार रस्ते व आपल्या मतदार क्षेत्राचा विकास या गोष्टींना प्राधान्य दिले नाही, तसेच भिवंडी व ग्रामीण भागात रोज होणाऱ्या वाहतूक कोंडी बाबत कोणतेही उपाय योजणे बाबत ठोस पाऊल उचलले नाही त्यामुळे येथील मतदार राजा नेहमी वाहतूक कोंडीला वैतागला होता. येथील वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी कशेळी ते अंजुर फाटा दरम्यान ठीक ठिकाणी उड्डाण पुलाची आवश्यकता होती मात्र तसे झाले नाही. 
       कपिल पाटील यांनी प्रत्येक गावातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये होणारे तुरळक वाद मिटवून सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न "न" केल्याने गावा गावात दोन, दोन -तिन तिन गट- तट  निर्माण झाल्याने अशांततेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे त्याचाही फटका कपिल पाटील यांना नकळत बसल्याचे बोलले जात आहे.
         त्या उलट नवनिर्वाचित मा.खासदार श्री बाळ्या मामा यांनी स्थानिक भूमी पुत्रांना आपल्या गोदामे बांधकाम विकासा दरम्यान त्या त्या ठिकाणारील बेरोजगारांना काम धंदा मिळवून दिल्याने तरुण वर्ग त्यांच्या पाठीशी उभा राहिला. तसेच बाळ्या मामा यांनी आपल्या रोजच्या दैंननदिन काळात त्यांच्याकडे येणाऱ्या गरजूंना वेळोवेळी मदतीचा हात पुढे केल्याने मामा यांचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढतच गेल्याने ही प्रतिष्ठेची झालेली निवडणूक तरुण मतदार राजाने आपल्या हातात घेवून विजयी श्री खेचून आणली आहे. बाळ्या मामा यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून आज (दिं,५) सकाळ पासूनच कार्यकर्त्यांची रीघ गुंदवली गावातील त्यांच्या कार्यालयात लागली आहे .
          भिवंडी हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदार संघांपैकी एक आहे. या मतदार संघामध्ये ठाणे जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. या मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळ्या मामा म्हात्रे आणि भाजपचे कपिल पाटील यांच्यात थेट लढत झाली होती. पाटील हे दुसऱ्या स्थानावर होते तर अपक्ष उमेदवार श्री.निलेश सांबरे हे तिसऱ्या स्थानावर होते. सांबरे यांचे सामाजिक कार्य चांगले असले तरी त्यांना आगरी मतदार राजाला आपल्याकडे वळून घेता आले नाही. तसेच मुस्लिम मतदार एकजुटीने महाविकास आघाडीच्या पाठिशी उभे राहिल्याने सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांचा विजय झाला.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...