Tuesday 4 June 2024

लोकनिर्माण प्रतिष्ठान आयोजित अभिनय कार्यशाळा मुंबईत उत्साहात संपन्न !!

लोकनिर्माण प्रतिष्ठान आयोजित अभिनय कार्यशाळा मुंबईत उत्साहात संपन्न !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

        लोकनिर्माण वृत्तपत्र हे संपूर्ण महाराष्ट्रातील वाचकांना माहीत आहे. सामाजिक सेवा करुन वंचित समाजाचा विकास करण्यासाठी वृत्तपत्राचे संपादक बाळकृष्ण कासार यांनी लोकनिर्माण प्रतिष्ठान या संस्थेची अधिकृत नोंदणी करुन स्थापना केली.  संस्थेचे चिपळूण येथे उद्घाटन झाले. याबाबतची प्रसिद्धी मुंबई ठाणे, रायगड, रत्नागिरी येथील विविध दैनिके, साप्ताहिके, डिजिटल माध्यम आणि युट्यूब चॅनल यांनी दिली. संस्थेचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण महाराष्ट्रात असून प्रत्येक जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते यांनी संस्थेचे काम करण्यास उत्सुकता दाखवली. 

             त्यानंतर संस्थेचा पहिलाच कार्यक्रम मुंबई कुर्ला येथे अभिनय कार्यशाळा आयोजित करून चार दिवसाचा कार्यक्रम राबविण्यात आला. पहिल्याच कार्यक्रमासाठी ज्यांना अभिनय क्षेत्रात करिअर करायचं आहे अशा इच्छुक आणि होतकरू कलाकारांनी आपली नावे नोंदवून चांगला प्रतिसाद दिला. या अभिनय कार्यशाळेचा समारोपाचा कार्यक्रम नुकताच उपस्थित मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करुन झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध अभिनेता, लेखक, दिग्दर्शक - महेश कापरेकर , लोकनिर्माण प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष युयुत्सु आर्ते, खजिनदार पूनित कासार, अपना बॅंकेचे महाव्यवस्थापक  संतोष केसरकर आदी मान्यवर  उपस्थित होते.
              या अभिनय कार्यशाळेत प्रशिक्षक  लेखक, दिग्दर्शक - सागर माने, आणि अनिकेत खेडेकर यांनी मोलाचं योगदान दिलं,  लोकनिर्माण प्रतिष्ठान संस्थेच्या सांस्कृतिक विभागाचे मुंबई अध्यक्ष संतोष गायकर यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नियोजन उत्तम रित्या पार पाडले.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...