Tuesday 4 June 2024

शिवाय मेघा फिल्म कडून "राक्षस शक्तिमान मुलं युक्तीमान" ह्या बालनाट्यचा १७वां यशस्वी प्रयोग !!

शिवाय मेघा फिल्म कडून "राक्षस शक्तिमान मुलं युक्तीमान" ह्या बालनाट्यचा १७वां यशस्वी प्रयोग !!

मुंबई - निलेश कोकमकर 
      शिवाय मेघा फिल्म निर्मित आणि व्ही. आर. प्रोडक्शन प्रस्तुत तसेच हास्य,विनोदी कलाकार लेखक भूषण कडू यांच्या लेखणीतून साकार झालेलं राक्षस शक्तिमान मुलं युक्तीमान" हे दोन अंकी धम्माल विनोदी बालनाट्य आहे. शिवाजी मंदिर नाट्यगृह दादर येथे १७ वा प्रयोग रसिक प्रेक्षक आणि लहान मुलांच्या उपस्थित पार पडला. ह्या  नाटकाचे शिवाय मेघा फिल्म कडून १७ यशस्वी प्रयोग झाले असून त्या आधी १३ प्रयोग झाले होते असे एकूण ३० यशस्वी प्रयोग पार पडले आहे. लहान मुलांसोबत पालकांनी सुद्धा आवर्जून पाहण्यासारखे हे नाटक आहे. 
        निर्माता सत्यजीत सुहास भालेराव,दिग्दर्शक  अजय राणे आणि ह्या नाटकात अभिनय करणारे कलाकार: निकुंज शिवलकर, स्वराज पवार, आध्या सागवेकर, अस्मी वजीरकर, विग्नेश वडके, ध्रुवी ढवळे, मृणाल कोळी, ईशा वायकर, नेत्रा वायकर, सात्विक पेटकर, साची कांबळे, ओवी देवधर, अर्णा कांबळे, डॉ. संकेत देशमुख, निकिता सावंत, विकास मेंगे, सुशील पांचाळ, विस्मय कासार, देवयानी पेंढुरकर, राहुल साटम, रिद्धी डिघे, श्लोक दिसले, विकास पवार, राजन कोळी, साक्षी देसले इत्यादींनी खूप मेहनत घेऊन नाटकाला उंच पथावर नेऊन ठेवले आहे.
         येत्या रविवारी म्हणजेच दिनांक ९ जून २०२४ रोजी सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवली येथे सायंकाळी ४.३० ते ७.३० वाजता ह्या वेळेत होणार आहे. तरी त्या विभागातील पालकांनी आपल्या मुलांना अवश्य हे नाटक दाखवावे. असे आवाहन निर्माता यांनी केले आहे. त्या साठी bookmy show, tikitalay येथे जाऊन ऑनलाईन बुकिंग करू शकता किंवा  ७८७७७८४०४० ह्या नंबर वर फोन करून बुकिंग करू शकता.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...