Thursday, 13 June 2024

अंबरनाथ नगरपालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याची पावसाने केली पोलखोल !!

अंबरनाथ नगरपालिकेच्या नालेसफाईच्या दाव्याची पावसाने केली पोलखोल !!


अंबरनाथ, प्रतिनिधी : शहरात आज दुपारी तीननंतर आलेल्या पावसाने झोडपून काढले. पहिल्याच पावसात शहरातील महत्त्वाचे रस्ते पाण्याखाली गेल्याने काही काळासाठी वाहतूक ठप्प होती.

पावसाचा जोर वाढल्याने शहराच्या पूर्ण आणि पश्चिमेकडे सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने कल्याण-बदलापूर रस्ता, विमको नाका, डीएमसी कंपनी रोड, गजानन महाराज मंदिर, बी-केबिन, रेल्वे स्थानक परिसरात पावसाचे पाणी साचले. बी-केबिन परिसर, तसेच बुवा पाडा भागात काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना मनस्ताप झाला. दोन ठिकाणी झाडे पडल्याची नोंद आहे. महत्त्वाचे म्हणजे, शहरातील अनेक भागांत पावसाचे पाणी साचल्याने पालिका प्रशासनाने केलेला नालेसफाईचा दावा फोल ठरल्याने समाज माध्यमांवर वेगळीच चर्चा रंगली होती.

No comments:

Post a Comment

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !!

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !! पेण, (पंकजकुमार पाटील) - खारेपाट भागातील विठ्ठल नगर या गावात दरवर्षी प्रमाणे नाथस...