Thursday 13 June 2024

बनेली (टिटवाळा) येथे अनधिकृत चाळींचे बांधकाम जोरात !!

बनेली (टिटवाळा) येथे अनधिकृत चाळींचे बांधकाम जोरात !!

** 'अ' प्रभागाकडून दिखाव्या पुरती कारवाई 



कल्याण, प्रतिनिधी : टिटवाळा-बनेली येथील २५ एकरच्या एका मोकळ्या भूखंडावर भूमाफियांनी बेकायदा चाळी उभारण्याचा सपाटा लावला आहे. राजरोस बेकायदा चाळींची बांधकामे सुरू असताना या बेकायदा चाळींवर अ प्रभागाकडून फक्त दिखाव्या पुरती कारवाई केली जाते, अशा तक्रारी स्थानिक रहिवाशांनी केल्या आहेत.

अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त किशोर खुताडे यांच्या आशीर्वादाने ही बेकायदा चाळींची बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिक रहिवासी करत आहेत. यासंबंधीच्या चित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित झाल्या आहेत. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील टिटवाला बनेली भागातील २५ एकरचा मोकळा भूखंड भूमाफियांनी बेकायदा चाळी बांधून हडप करण्यास सुरुवात केली आहे. तरीही अ प्रभागाचे साहाय्यक आयुक्त आणि तोडकाम पथक, बीट मुकादम हा सगळा प्रकार कारवाई न करता पाहत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी अनेक नागरिकांनी पालिका मुख्यालयात तक्रारी केल्या आहेत.

टिटवाळा, मांडा भागातील बनेली परिसर हा एकमेव मोकळा पट्टा आहे. तोही आता माफियांच्या बेकायदा चाळींच्या विळख्यात चालल्याने स्थानिक रहिवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. पावसाळ्यात या सर्व बेकायदा चाळींना पावसाच्या पाण्याच्या विळखा पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...