Sunday 2 June 2024

ग्रामपंचायत कर्मचारी हा खरा गावाचा सेवक..का अमृत महाजन

ग्रामपंचायत कर्मचारी हा खरा गावाचा सेवक..का अमृत महाजन
 

पाचोरा , प्रतिनिधी : लोहारा तालुका पाचोरा.. ग्रामपंचायत कर्मचारी हा गावासाठी उन वारा पाऊस वेळ याची तमा न बाळगता काम करीत असतो. कोरोना काळात तर गावामध्ये  ग्रामपंचायत कर्मचारी पाणीपुरवठा साफसफाई शिपाई काम करताना दिसायचा..  जीव धोक्यात घालून त्यांनी काम केले अशा कर्मचाऱ्याला ना वेळेवर पगार ना इतर हक्क !! असे असतानाही तो काम करीत असतो.. अशावेळी तो सेवानिवृत्त झाल्यावर त्याच्या पाठीवर किमान कौतुकाची थाप देणे ही सुजान ग्रामपंचायत पदाधिकारी अधिकारी आणि गाव समाज यांचे कर्तव्य आहे.. कर्मचारी यांनी आपले वेतन पेन्शन प्रॉव्हिडंट फंड आदी हक्क मिळण्यासाठी संघटनेला प्राधान्य द्यावी तरच पंचायत व्यवस्थापन शासन आपल्या बांधण्याची दखल घेईल  असे प्रतिपादन ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाची राज्यसचिव का. अमृत महाजन यांनी लोहारा ग्रामपंचायतीचे  पाणीपुरवठा कर्मचारी सुभाष रामराव बाविस्कर यांच्या सेवापुर्ती सन्मान  सभेत बोलताना केले.. 

श्री बाविस्कर हे फेब्रुवारी 2024 मध्ये सेवानिवृत्त झाले असून ग्रामपंचायतीने त्यांना रोजंदारी कर्मचारी म्हणून परत सेवा विस्तार दिला आहे. त्यांच्या सेवानिवृत्ती ची बातमी जशी जशी गावात पसरत आहे तशी तशी लोक त्यांच्या सेवेच्या गौरव करीत आहेत म्हणून तालुका ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने दमोताबाई वाचनालयात श्री बाविस्कर दांपत्य यांचा कल रोजी सत्कार ठेवला होता या सभेचे आयोजक पाचोरा तालुका ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र खरे यांनी केले होते .त्यांनी संबंध कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले त्यावेळी या सभेत श्री श्री बाविस्कर व त्यांच्या अर्धांगिनी सरलाताई बाविस्कर यांच्या शाल श्रीफळ  बुके बागायती रुमाल ड्रेस टोप्या, साडी देऊन लोहारा गावातील अनेकांनी त्यांच्या सन्मान केला .त्यात उत्तर महाराष्ट्र परीट महासंघाचे उपाध्यक्ष श्री रमेश लिंगायत माध्यमिक शिक्षक श्री पवार वाचनालयाची ग्रंथपाल श्री  कलाल, पत्रकार चंदू खरे तसेच लोहारा परिसरातील ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी सन्मान केला .. व श्री बाविस्कर यांच्या सेवाकाळावर तोंड भरून कौतुक केले .. या सभेला ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे राज्य समिती सदस्य  निलेश पाटील, निलेश गोपाळ चेतन राजपूत मंगेश खैरनार राजू कोळी रमेश सोनवणे मीना लोहारे चंद्रकांत शेळके  प्रवीण चौधरी आदी कर्मचारी महासंघाचे सभासद पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

पर्यावरण, भु-गर्भ व भु-जल समिती स्थापन करून अहवाल मागवावा !

पर्यावरण, भु-गर्भ व भु-जल समिती स्थापन करून अहवाल मागवावा ! (विकासक प्रशांत शर्मा यांच्या बांधकाम प्रकरणी डॉ. माकणीकर यांची मागणी.) ...