Sunday 2 June 2024

5/5 वर्षे होऊन सुद्धा सेवानिवृत्त वयोवृद्ध अंगणवाडी सेविकांना/ मदतनीस यांना सेवानिवृत्ती रकमेपासून वंचित !

5/5 वर्षे होऊन सुद्धा सेवानिवृत्त वयोवृद्ध अंगणवाडी सेविकांना/ मदतनीस यांना सेवानिवृत्ती रकमेपासून वंचित !

** सरकार विरुद्ध आसंतोष !  जिल्हाधिकारी कार्यालयावर काठी मोर्चा काढणार !!

जळगाव, प्रतिनिधी... जिल्ह्यातील शंभरच्या वर अंगणवाडी सेविका मदतनीस सेवानिवृत्त होऊन 1 ते 5 वर्षे झालीत परंतु त्यांना वारंवार पाठपुरावा करून सुद्धा सेवानिवृत्तीनंतरचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे ते हालाखित जीवन जगत आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन नाही सरकार सेवानिवृत्त सेविका.. एक लाख रुपये, तर मदतनीस 75 हजार रुपये रक्कम 65 वर्ष वयोमर्यादेची सेवा झाल्यावर लाभ देते.. 

सेवानिवृत्त झाल्यावर लगेच या रकमा शासनाने द्यावयास पाहिजे परंतु आज सेवानिवृत्त होऊन पाच ते सहा वर्षे रकमा मिळालेल्या नाहीत काही सेविका मदतनीस तर झालेल्या  सत्तरि पर गेलेल्या आहेत. काही जराजर्जर आहेत. काही निराधार आहेत. पण त्यांनी आयुष्यभर केलेल्या महिला बालकल्याण विकास योजना अंतर्गत मोलाची सेवा देऊनही सेवानिवृत्ती नंतरचा लाभाच्या रकमा मिळालेल्या नाहीत  त्या वयोवृद्ध असल्यामुळे त्यानुसार आजारपणाची औषधे उदरनिर्वाह साठी त्यांना पैशाची अत्यंत आवश्यकता आहे.

त्यातच एकात्मिक बाल विकास प्रकल्प सेवा योजना खात्याचा सर्व कारभार ऑनलाईन ? असल्यामुळे त्या सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांची बँक अकाउंट व इतर कागदपत्रे सर्व माहिती पाठवले किंवा कसे यासंदर्भात कुठलीही पोहच स्थानिक प्रकल्प अधिकारी व जिल्हा कार्य पालन अधिकाऱ्यांकडे उपलब्ध नाही.. ते शासनाकडे आम्ही ऑनलाईन माहिती पाठवलेली आहे एवढं तोंडी उत्तर देऊन वेळ मारून नेतात त्यामुळे नेमका पाठपुरावा केव्हा व कुठे करावा हेच समजत नाही. तरी सेवानिवृत्त झालेल्या सेविका मदतनीस यांची कागदपत्रे स्थानिक प्रकल्पाकडून आपल्या कार्यालयात,तेथून आपल्या कार्यालयाकडून एलआयसी विभागात देऊन योग्य त्या लाभाच्या प्राप्तीसाठी ऑफलाइन कागदपत्रे व्यवहार  पारदर्शी व्यवहार असावा जिल्ह्यात एकूण 25 सेवानिवृत्त सेविका मदतनिस यांची नावानिशी तपशीलवार महाराष्ट्र राज्य महिला बालकल्याण आयुक्तांकडे तक्रार देण्यात आलेली आहे याव्यतिरिक्त जिल्ह्यात अशा सेवानिवृत्त सेविका मदतनिस यांची संख्या 200 च्या आसपास आहे यांनी या सर्व सेवानिवृत्तांना 25 जूनच्या आत त्यांच्या सेवानिवृत्तीच्या लाभाची रक्कम आदा करावी अशी मागणी जळगाव जिल्हा अंगणवाडी बालवाडी कर्मचारी य युनियनने केली आहे. 

अन्यथा येत्या  26 जून रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर या सर्व जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त सेविका मदतनीस काठी मोर्चा काढतील असा इशारा संघटनेचे जिल्हा सरचिटणीस का अमृत महाजन यांनी दिला आहे

No comments:

Post a Comment

पर्यावरण, भु-गर्भ व भु-जल समिती स्थापन करून अहवाल मागवावा !

पर्यावरण, भु-गर्भ व भु-जल समिती स्थापन करून अहवाल मागवावा ! (विकासक प्रशांत शर्मा यांच्या बांधकाम प्रकरणी डॉ. माकणीकर यांची मागणी.) ...