Friday 21 June 2024

श्री समर्थ कृपा भजन मंडळाचा २३ जुन रोजी १४ वा वर्धापनदिन सोहळा व भव्य - दिव्य भजन स्पर्धेचे आयोजन !!

श्री समर्थ कृपा भजन मंडळाचा २३ जुन रोजी १४ वा वर्धापनदिन सोहळा व भव्य - दिव्य भजन स्पर्धेचे आयोजन !!

किर्तनकार ह.भ.प.श्री पंढरीनाथ महाराज आरु - ( आळंदी ) यांचं सुश्राव्य किर्तन होणार सादर...!

विरार - ( दिपक कारकर ) :

आध्यात्मिक ओढीने, वारकरी सांप्रदायिक भक्तीने प्रतिवर्षी मोठया उत्साहाने वर्धापनदिन व भव्य -दिव्य भजन स्पर्धेचे आयोजन करून स्तुत्य उपक्रम राबविणाऱ्या श्री समर्थ कृपा भजन मंडळ ( नालासोपारा - विरार ) - गाडीची वेळ स.०९. ४३ ( विरार ते चर्चगेट ) यांच्या वतीने साजरा होणारा ह्यावर्षीचा १४ वा वर्धापनदिन रविवार दि.२३ जुन २०२४ रोजी एकदिवसीय आयोजनात "जीवदानी मंगल कार्यालय",मोरेश्वर विद्यालय जवळ, मोरेगाव नाका, विरार रोड, नालासोपारा ( पूर्व ) ता. वसई, जि. पालघर- ४०१२०९ येथे संपन्न होणार आहे.

ह्या सोहळ्यानिमित्ताने "संतांची शिकवण आणि भक्तीचा सोहळा" अशा पंक्ती प्रमाणे बहारदार अशी भजन स्पर्धा नियोजित करण्यात आली आहे. अनेक बक्षिसे असणारी व युट्यूब लाईव्ह प्रसारण असणाऱ्या ह्या स्पर्धेत  संत सेवा भजन सामाजिक संस्था, संत ज्ञानेश्वर माऊली भजन सामाजिक संस्था या संस्थेतील १५० हुन अधिक भजन मंडळ उपस्थित राहणार आहेत.दरम्यान २०२३-०२४ वर्षातील भजन स्पर्धेत उत्कृष्ट डफली वादक व सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्रातील भजन मंडळांचा गुणगौरव सोहळा देखील पार पडेल.

भक्तिमय वातावरणात दिवसभरच्या भरगच्च आयोजनात सकाळी ६ वा. श्री सत्यनारायण महापूजा,स. ८ वा., दिपप्रज्वलन, सामूहिक पालखी सोहळा, पंचपदी ह.भ.श्री सदानंद गायकवाड माऊली यांचा कार्यक्रम, शिवाय भजन स्पर्धा, स्नेह भोजन, हळदी कुंकू समारंभ व हरी किर्तनकार ह.भ.प. श्री.पंढरीनाथ आरु महाराज ( आळंदी ) यांचे श्रवणीय किर्तन सादर होईल. दरम्यान मृदूंग महामेरू ह.भ.प. श्री चंदू महाराज पांचाळ यांची उपस्थिती असेल. रात्रौ ०९ वा. मान्यवर सत्कार व भजन स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा होऊन कार्यक्रमाची सांगता होईल.

उपरोक्त मंडळाची कार्यकारिणी संस्थापक - ह.भ.प. श्री.विश्वनाथ बांद्रे, अध्यक्ष - अरविंद मोरे, कार्याध्यक्ष -:प्रणव लांबाडे, खजिनदार - जनार्दन शिंदे ( बापू ), सचिव - सचिन धाडवे, उपाध्यक्ष - संदीप जोशी, सहखजिनदार - गजानन जोशी, उपसचिव - विशाल शिर्के, सदस्य - सत्यवान केसरकर, राजेश येले, संदीप तावडे, राजू धाडवे, आदी मंडळाचे अनेक सभासद व हितचिंतक यांच्या अथक परिश्रमाने नियोजनाची जय्यत तयारी सुरु आहे. ह्या सोहळ्याचा उत्साह वाढविण्यासाठी वारकरी भाविक, भजनप्रेमी यांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री समर्थ कृपा भजन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयाच्या संचालकांच्या फतव्या विरोधात बेमुदत साखळी उपोषण !!

के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयाच्या संचालकांच्या फतव्या विरोधात बेमुदत साखळी उपोषण !! *** पेंढारकर कॉलेज मध्ये घडलेल्या घटनांच्य...