Friday, 21 June 2024

विवा महाविद्यालयात योगसाधना ___

विवा महाविद्यालयात योगसाधना ___

वसई, प्रतिनिधी : दिनांक २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त श्री.अंबिका योगाश्रम, विशाल नगर वसई शाखा आणि विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट विरार संचालित विवा इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबीर उत्साहात संपन्न झाले. संस्थेचे विश्वस्त श्री. संजीव पाटील तसेच श्री अंबिका योगाश्रम चे श्री. राजीव मोहिले सर, श्री.मनोज राऊत सर, श्रीमती. किरण गुप्ताजी आणि इतर सहकारी यांनी योग साधनेचे आपल्या जीवनातील असलेले  महत्व  तसेच विविध योगासनाबद्दल  माहिती, त्यांचे प्रकार ह्यांचे बहुमूल्य मार्गदर्शन केले आणि विविध योगसने ह्यांची प्रात्यक्षिके करुन दाखवली.

विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट मधील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण पूर्व व श्री मलंग विभागात अखंड वीजपुरवठ्यासाठी MSEDCL अधिकाऱ्यांसोबत बैठक; स्विचिंग स्टेशन व RDSS प्रकल्पांवर चर्चा !!

कल्याण पूर्व व श्री मलंग विभागात अखंड वीजपुरवठ्यासाठी MSEDCL अधिकाऱ्यांसोबत बैठक; स्विचिंग स्टेशन व RDSS प्रकल्पांवर चर्चा !! *क...