Saturday 22 June 2024

'सावित्रीबाई सोनू तोरस्कर' यांचे निधन

'सावित्रीबाई सोनू तोरस्कर' यांचे निधन 

मुंबई (शांताराम गुडेकर) :
             रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील कासार कोळवण गावातील रहिवाशी श्री.यशवंत सोनू तोरस्कर यांच्या मातोश्री सावित्रीबाई सोनू तोरस्कर यांचे (दि.२१ जून २०२४) रोजी प्रदीर्घ आजाराने शताब्दी हॉस्पिटल कांदिवली येथे निधन झाले. त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी पांडुरंग सोनू तोरस्कर १५/९६ कुंती कृष्णा महाराष्ट्र हॉसिंग बोर्ड. दत्त पाडा, बी.एम.सी शाळेजवळ, बोरिवली पूर्व मुंबई-६६ येथे ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्यावर दहिसर येथील दौलत नगर येथील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आले. अंत्यविधीला कासार कोळवण गाव आणि आजू -बाजूच्या गावातील भावकी, गावकी, समाज बांधवआणि नातेवाईक मोठया संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात यशवंत, पांडुरंग, विजय, तानाजी असे चार मुलगे व सुना, नातवंडे असा मोठा परिवार  आहे. त्यांच्या दुःखात सर्व कासार कोळवण गाव, नातेवाईक  सहभागी असून मृतदेहास चिरशांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना अशी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

No comments:

Post a Comment

के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयाच्या संचालकांच्या फतव्या विरोधात बेमुदत साखळी उपोषण !!

के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयाच्या संचालकांच्या फतव्या विरोधात बेमुदत साखळी उपोषण !! *** पेंढारकर कॉलेज मध्ये घडलेल्या घटनांच्य...