Tuesday 18 June 2024

अध्यात्मिक पिता- संत राजिन्दर सिंह जी महाराज


अध्यात्मिक पिता
-  संत राजिन्दर सिंह जी महाराज

प्रभु-परमेश्वर आपला अध्यात्मिक पिता आहे. प्रत्येक पालकांप्रमाणे, प्रभु-परमेश्वरची देखील इच्छा आहे की आपण त्याची आज्ञाधारक मुले व्हावीत आणि प्रभु-परमेश्वराकडून आपल्याला मिळालेल्या दैवी देणगी साठी कृतज्ञ असावे.  प्रत्येक पालकाला आपल्या मुलांमध्ये सद्गुण असावेत असे वाटते जे सद्गुण मुलांमध्ये त्यांच्या मते असतात.  आपला मुलगा किंवा मुलगी चांगली व्यक्ती व्हावी हा प्रत्येक पालकाचा प्रयत्न असतो.  पालकांना आपल्या मुलांकडून खूप अपेक्षा असतात, पण सर्वप्रथम आपल्या मुलाने एक आदर्श मानव व्हावे, अशी त्यांची इच्छा असते.
प्रभु-परमेश्वर हा देखील यापेक्षा वेगळा नाही. जेव्हा प्रभु-परमेश्वराने सर्व आत्मे निर्माण केले तेव्हा आपण सर्वांनी प्रभु-परमेश्वराचे रूप बनावे, अशी त्याची अपेक्षा होती. मानवाला प्रभु-परमेश्वराच्या प्रतिमेत निर्माण केले आहे. म्हणून वास्तवात मानव हा प्रभु-परमेश्वराच रूप आहे. प्रत्येक मानवाने माणुसकीने सदाचारी पवित्र जीवन जगावे अशी प्रभु-परमेश्वराची इच्छा होती, परंतु मानवी शरीरात राहून आपण आपल्या मनाच्या प्रभावाखाली येऊन आपले वास्तविक अध्यात्मिक रूप विसरतो आणि प्रभु-परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगत नाही. प्रभु-परमेश्वरही प्रत्येक माणसाकडून अशीच चांगली अपेक्षा करतो.
आपण सर्वांनी त्याच्या सृष्टीतील प्रत्येक प्राणीमात्रावर प्रेम करावे, एकमेकांना मदत करावी तसेच प्रभु-परमेश्वरावर प्रेम करावे अशी त्याची अपेक्षा आहे. या हेतूने विश्वाची निर्मिती केली गेली आणि मानवाची रचना केली. असे म्हणतात की प्रभु-परमेश्वराने मानवाची निर्मिती केली जेणेकरून त्याने आपल्या सोबतीं बरोबर आणि इतर प्राण्यांशी दया आणि करुणेने वागावे. संत आणि सतगुरुंच्या रूपाने आपल्या अध्यात्मिक पित्याने आपल्याला दिलेले संरक्षण चक्र अद्वितीय  आणि उदार आहे.
प्रभु-परमेश्वर हा आपला खरा पिता आहे जो नेहमी आपले रक्षण करतो. प्रभु-परमेश्वराने संत आणि सतगुरुंना संसारात यासाठी पाठविले आहे कारण ते आपल्या आत्म्याला परत प्रभु-परमेश्वरामध्ये लीन करतील. ते प्रभु-परमेश्वराचे प्रतिनिधी म्हणून या जगात नेहमी असतात आणि सर्व जीवांना मदत करतात. असे जगात नेहमीच घडत राहील. जेव्हा जेव्हा आत्मा प्रभु-परमेश्वराला भेटण्यासाठी व्याकुळ होतो, तेव्हा प्रभु-परमेश्वर असे साधन निर्माण करतो ज्याद्वारे आत्मा पूर्ण सद्गुरुंच्या आश्रयाला येतो आणि त्याला समजते की कशा प्रकारे अत:र्मुख होऊन प्रभु-परमेश्वराशी कसे जोडले जाऊ शकतो आणि त्याला प्राप्त करू  शकतो.
आपले सद्गुरु आपल्याला आपल्या जीवनात कर्माची फळे भोगण्यापासून मुक्त होण्यास मदत करतात. जर आपण अध्यात्मिक आणि सद्गुणी जीवन जगलो तर आपण स्वतःसाठी नवीन वाईट कर्म तयार करीत नाहीत, ज्यासाठी आपल्याला पुढे कष्ट भोगावे लागत नाही. जर आपण जीवनात प्रेमळ, दयाळूपणा आणि निःस्वार्थ सेवा हे गुण अंगिकारले आणि इतरांना मदत करतांना, त्या बदल्यात कोणत्याही फळाची अपेक्षा केली नाही, तर आपण स्वतःसाठी नवीन कर्म तयार करत नाही, ज्यामुळे आपणास या जगात परत येण्याचे कारण बनेल. 
संत आणि महापुरुष आपल्याला समजावून सांगतात की आपलया जीवनाचा 75 टक्के भाग आधीच निश्चित आहे पण 25 टक्के आपल्याला कर्म करण्यासाठी स्वातंत्र्य आहे. ज्याचा योग्य रीतीने वापर करून, ध्यान-अभ्यास साधना, सत्संगाला जाणे, पूर्ण सद्गुरूंचे दर्शन घेणे इत्यादी कामात वेळ देऊन निष्काम सेवा करण्याच्या अवस्थेला पोहोचतो. असे केल्याने आपल्या कर्माचा हिशेब या जन्मातच संपतो. आपण परमेश्वराची चांगली मुले बनतो, परिणामी जीवनाच्या शेवटी आपल्या आत्म्याला परत यावे लागत नाही आणि तो परत प्रभु-परमेश्वराच्या कुशीत लीन होतो.

No comments:

Post a Comment

के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयाच्या संचालकांच्या फतव्या विरोधात बेमुदत साखळी उपोषण !!

के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयाच्या संचालकांच्या फतव्या विरोधात बेमुदत साखळी उपोषण !! *** पेंढारकर कॉलेज मध्ये घडलेल्या घटनांच्य...