जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धांना अलिबाग मध्ये सुरुवात !!
पनवेल, दि.18:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे वतीने जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धाना जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आज सुरुवात करण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक विजय बाविस्कर राखीव यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र आतनूर, धर्मेंद्र सातवदे, राजाराम कुंभार, मनोहर टेमकर, अमित विचारे, कुमारी तपस्वी गोंधळी, पंच साहिल कांबळे, नितेश जगताप, रितेश ठाकूर, प्रथमेश पाटील, देव सातवदे, विराज देशमुख इत्यादी मान्यवर व क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
उपस्थित खेळाडूंना विजय बाविस्कर म्हणाले की, खेळाडूंनी चांगल्या खेळाडूंनी खेळाडू वृत्ती जोपासावी तसेच खेळताना दुखापत होणार नाही याची काळजी घेऊन चांगल्या खेळाचे प्रदर्शन करावे. विजयी होणाऱ्या संघांनी पुढील स्तरावर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा अशा शुभेच्छा त्यांनी खेळाडूंना दिल्या. यावेळी खेळाडूंमध्ये उत्साह दिसून आला. सन 2024-25 मधील शालेय क्रीडा स्पर्धांना या स्पर्धेने सुरुवात झाल्यामुळे खेळाडू आनंदित झाले आहे. या स्पर्धांच्या आयोजनासाठी पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्यावतीने वैद्यकीय पथक सचिन राठोड यांचे नेतृत्वात या स्पर्धेसाठी रुग्णवाहिकेसह सेवा देत आहे. या स्पर्धेत विजयी होणारे संघ ठाणे येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
यावेळी खेळाडू प्रतिनिधी म्हणून अनुज यादव व जानवी म्हात्रे या खेळाडूंचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र अतनुर यांनी केले व आभार क्रीडा अधिकारी सचिन निकम यांनी मानले.
No comments:
Post a Comment