Friday, 19 July 2024

गटप्रवर्तक‌ यांचा एल्गार ! 25 जुलैला जेलभरो आंदोलनाची हाक !!!

गटप्रवर्तक यांचा एल्गार ! 25 जुलैला जेलभरो आंदोलनाची हाक !!!

जळगाव.. दिनांक 18 जुलै रोजी जळगाव येथील जीएस ग्राउंडवर भाकप व जनसंघटना आंदोलनात जिल्ह्यातील गटप्रवर्तकांनी लिहिलेले भाग घेतला त्या आंदोलनात सरकारने नुकत्याच घेतलेल्या मानधनवाढीच्या निर्णयामुळे गतप्रवर्तक यांना फक्त एक हजार रुपये वाढ दिल्याने नाराज झालेल्या गटप्रवर्तक त्यांचे स्वतंत्र निवेदन आयटक मार्फत जिल्हाधिकारी आयुष्य कुमार यांना दिले. 

त्यावेळी शासनाला इशारा दिला,  येत्या **25 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जेलभरो आंदोलन व जोपर्यंत दहा हजार रुपये मानधन वाढ मिळत नाही तोपर्यंत कार्यालयीन कामकाजाचे अहवाल सादर करणार नाहीत__ तसेच सरकारने 'क्षूल्लक 1000 रुपये मानधन वाढ' ला फेटाळून लावत आहोत, असाही इशारा त्यांनी आपल्या निवेदनात जिल्हाधिकारी व त्या ठिकाणी मिटींगला आलेले जिल्हा आरोग्य अधिकारी श्री भायेकर साहेब यांना दिला. 

त्यावेळी अमृतराव महाजन यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळात सुनिता ठाकरे, राधा धनगर, धनश्री बडगुजर, छाया पाटील, ज्योती पाटील, कविता सरोदे, रूपाली पाटील, छाया मोरे, शीला कोळी, योगिता बारी, ज्योती चौधरी, जयश्री सूर्यवंशी, सुवर्णा देसले, संगीता रेगे, रूपाली महाजन, मनिषा बडगुजर, अर्चना पाटील, लता सुशीर आदीं सर्व एकत्र जमलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी दिला व आंदोलनामध्ये सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

प्रचार फेरी दरम्यान गणेश चुक्कल लहान मुलांमध्ये रमले !!

प्रचार फेरी दरम्यान गणेश चुक्कल लहान मुलांमध्ये रमले !! **लहान मुलांना दिल्या बालदिनाच्या शुभेच्छा  घाटकोपर, (केतन भोज) ; घाटकोप...