गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशन,डॉ.ज्योत्स्ना गावडे, श्रीमती. यामिनी पाटणवार यांच्यातर्फे उर्मिला माने विद्यालय आसगे, लांजा येथे वह्या वाटप !!
मुंबई (शांताराम गुडेकर) :
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामधील गवाणे गावचे सुपुत्र, मुंबई उच्च न्यायालयाचे कर्मचारी, कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा लांजाचे उपाध्यक्ष,ऑल इंडिया हायकोर्ट फेडरेशनचे सदस्य,गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष-समाजसेवक चंद्रकांत शिवराम करंबळे आणि मुंबई मुलुंड येथे राहणाऱ्या डॉक्टर ज्योत्स्ना गावडे मॅडम (बी.ए.एम.एस/ एम.डी) (आयुर्वेदचार्य) तसेच छत्तीसगड उच्च न्यायालय बेलासपूर कोर्टाच्या सहाय्यक अधिकारी श्रीमती यामिनी पाटणवार मॅडम (Yamini Patanwar, Designation - Asst. Gr.-I Court- High Court of Chhattisgarh, Bilaspur) यांच्यावतीने लांजा येथील उर्मिला माने विद्यालय आसगे येथे वह्या वाटप करण्यात आले. यावेळी गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष- समाजसेवक चंद्रकांत शिवराम करंबळे, उपाध्यक्ष- सुभाष धनाजी रामाणे, सचिव अमोल मिस्त्री, सदस्य- रवींद्र कोटकर, कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा लांजा ग्रामीण शाखेचे अध्यक्ष श्री.अनिल कसबले, सचिव-श्री.मनोज चंदुरकर, आसगे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक आसगे संस्थेचे उपाध्यक्ष पांडुरंग चौगुले, कार्यवाहक राजाराम चव्हाण, संचालक काशीराम मांडवकर,स्थानिक हितचिंतक कमिटीचे सदस्य विकास मांडवकर, विश्वास मांडवकर, दिलीप दाभोळकर, विनायक शेलार, अनिल कांबळे, कृष्णा भारती, विष्णू मांडवकर, प्रशाळेतील मुख्याध्यापिका साधना बावधनकर, व उपस्थित सर्व शिक्षक वृंद, पालक वर्ग, विद्यार्थी, विद्यार्थिनी आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment