Thursday, 18 July 2024

शिवसेना (उबाठा) शिव आरोग्य सेनेच्या वतीने वडाळा येथे मोफत आरोग्य शिबिर व मोफत औषधे वाटप !!

शिवसेना (उबाठा) शिव आरोग्य सेनेच्या वतीने वडाळा येथे मोफत आरोग्य शिबिर व मोफत औषधे वाटप !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
                 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉ.किशोरजी ठाणेकर यांच्या सूचनेनुसार  व महाराष्ट्र समन्वयक जितेंद्र दगडू (दादा) सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत दरवर्षीप्रमाणे देवशयनी आषाढी एकादशी निमित्ताने प्रति पंढरपूर वडाळा येथे विठ्ठल मंदिरा शेजारी मुंबईतील विविध भागातून पायी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी शिव आरोग्य सेनेच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर व संघटनेतील डॉक्टर टीमने रुग्ण तपासून मोफत औषधे उपलब्ध करून दिली. या आरोग्य शिबिरास वारकरी, विठ्ठल भक्त व स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. तसेच नवनिर्वाचित खासदार श्री.अरविंद सावंत, शिवसेना सचिव, मा.खासदार श्री.विनायक राऊत, मा. नगरसेवक श्री.अनिल कोकीळ, मुंबईचे मा.नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, मा. महापौर श्री.महादेव देवळे, समाजसेविका सौ. रेश्मा सकपाळ गावकर यांनी सदिच्छा भेट दिली. शिबिरात आरोग्य सेनेचे पॅरा.एक्यू.अध्यक्ष डॉ.शशिकांत मोरे, कांदिवली विधा.अध्यक्ष डॉ. संतोष भानुशाली, कांदिवली विधा. सचिव डॉ.धनंजय दढेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याप्रसंगी शिव आरोग्य सेनेचे मुंबई जिल्हा संपर्क समन्वयक अमोल वंजारे, मुंबई जिल्हा सचिव सौ.ज्योतीताई भोसले, समन्वय सचिव मुंबई उपनगर पूर्व  शिवाजी झोरे, अंधेरी विधा. समन्वय सौ.सुप्रिया बंगलेकर, भांडुप विधा. अध्यक्ष फार्मसी सेल स्वप्निल शिनकर, भांडुप विधा. समन्वयक अजिंक्य भोसले, प्रवीण ढवळे, सौ. मधुरा टमाटा, सौ. जयश्री चौधरी, सौ. छाया जामनिक, सायन विधानसभेच्या सौ. रजनी पाटील, श्रीमती लक्ष्मीप्रभा जाधव, सौ.ज्ञहर्षला नाईक, माहीम विधानसभेचे दीपेश पटवर्धन, संतोष वंजारे, शिवडी विधानसभेचे नंदकुमार बागवे, राजाराम झगडे, भायखळा विधानसभेचे श्री.संदेश कोटेकर, श्री. रवींद्र बाचनकर, हिंदुस्तान ठाणे जिल्हा आरोग्य संघटक डॉ.प्रशांत भुईबर, ठाणे जिल्हा सहसमन्वयक एकनाथ अहिरे, शहर सहसमन्वयक देवशी राठोड, नालासोपारा समन्वयक सचिव कु.कोमल पालकर, निराधार शैक्ष. सामा. संस्था महाराष्ट्र महिला कार्याध्यक्षा सौ.वसुधा वाळुंज, परळ उपशाखा संघटिका सौ. प्रमिला अडसूळ, सौ. सुजाता कोलते, सौ. लक्ष्मी कांबळे, हिंदुस्थान ट्रान्स.आणि जनरल कामगार सेना मुंबई चिटणीस श्री. लितेश केरकर व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

राम कदम यांच्यासाठी अनिल निर्मळे यांचा विक्रोळी पार्कसाईट मध्ये घरोघरी जाऊन प्रचार !!

राम कदम यांच्यासाठी अनिल निर्मळे यांचा विक्रोळी पार्कसाईट मध्ये घरोघरी जाऊन प्रचार !! घाटकोपर, (केतन भोज) : घाटकोपर पश्चिम विधान...