Friday, 15 November 2024

राम कदम यांच्यासाठी अनिल निर्मळे यांचा विक्रोळी पार्कसाईट मध्ये घरोघरी जाऊन प्रचार !!

राम कदम यांच्यासाठी अनिल निर्मळे यांचा विक्रोळी पार्कसाईट मध्ये घरोघरी जाऊन प्रचार !!

घाटकोपर, (केतन भोज) : घाटकोपर पश्चिम विधानसभा महायुतीचे भाजपचे उमेदवार राम कदम यांच्या विजयासाठी भापजचे घाटकोपर मंडल अध्यक्ष अनिल निर्मळे यांनी चांगलीच कंबर कसलेली दिसत आहेत. राम कदम यांच्या प्रचारार्थ विक्रोळी पार्कसाईट मध्ये प्रत्येक विभागात जाऊन ते नागरिकांची भेट घेऊन घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. राम कदम यांना या विधानसभेच्या निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी करणारच अशी शपथचं अनिल निर्मळे यांनी घेतलेली दिसत आहे. 

अनिल निर्मळे हे विक्रोळी पार्कसाईट मधील सर्व तरुणांच्या सदैव पाठीशी उभे राहून त्यांना सतत क्रिडाविषयक सहकार्य व मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे तेथील स्थानिक तरुणांमध्ये त्यांची चांगली छाप आहे. याचा फायदा निश्चित राम कदम यांना होणार आहे. अनिल निर्मळे यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रोळी पार्कसाईट येथे भाजपच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन देखील करण्यात आले. अनिल निर्मळे यांच्या सोबत त्यांचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी तुषार निर्मळ, प्रशांत कदम (बावा) हे राम कदम यांच्या प्रचारासाठी कठोर मेहनत घेताना दिसत आहेत.

No comments:

Post a Comment

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !!

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !! भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्...