** आमदारांनी मतदारसंघात केलेला विकास तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची लोकप्रियता
** प्रचार सभांना नागरिकांचा मिळणारा प्रचंड प्रतिसाद
कल्याण, सचिन बुटाला : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून झालेली बंडखोरी तसेच मतदारसंघात उध्दव ठाकरे यांना मानणारा एक मोठा वर्ग असल्यामुळे सुरवातीला चुरशीची वाटणारी लढत प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात एकतर्फी झाल्याचे जाणवत आहे.
मतदारसंघात आमदार विश्वनाथ भोईर यांनी दोन हजार कोटी रुपयांवर विकासाकरिता निधी आणला तसेच सर्वसामान्य नागरिकांना सहज उपलब्ध असणारे आमदार अशी त्यांची इमेज व प्रचारात घेतलेली आघाडी, प्रचार सभांना नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद, लोकप्रियता, शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मेहनत या व्यतिरिक्त भारतीय जनता पक्षाच्या बंडखोर उमेदवार यांची माघार, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा, प्रचारात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग तर उबठा कडून उभे असलेले उमेदवार जनतेला फारसे परिचित नाही आहेत तर पक्षांतर्गत असलेली नाराजी या सर्व बाबींचा विचार करता आमदार विश्वनाथ भोईर यांचा विजय एकतर्फी असा दिसत आहे.
No comments:
Post a Comment