कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे माननीय मा. केंद्रीय मंत्री कपिल पाटील, मा. आमदार नरेंद्र पवार व कल्याण पश्चिम अध्यक्ष वरुण पाटील, कल्याण पश्चिम मंडळ अध्यक्षा सौ. वैशालीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात उतरले असून गेले चार दिवसांपासून मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवसेना पक्षाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या विजयासाठी मतदारसंघांतील सर्व प्रभागात प्रचार करताना दिसत आहेत.
शेवटच्या टप्प्यात सर्वच उमेदवारांनी आपल्या प्रचाराचा जोर वाढविला असून महायुतीच्या उमेदवाराला मिळणारा मतदारांचा पाठिंबा लक्षणीय आहे, गेले चार दिवस वार्ड क्रमांक २३, (खडकपाडा) येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसरात आमदारांच्या विकासकामांविषयी मतदारांना सांगत राज्याच्या भविष्यासाठी महायुतीचा विजय किती महत्वाचा आहे याची माहिती दिली.
भारतीय जनता पक्षाचे कल्याण पश्चिमचे अध्यक्ष वरुण पाटील व कल्याण पश्चिम मंडळ अध्यक्षा सौ. वैशालीताई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वार्ड क्रमांक २३ येथे सरचिटणीस सौ. निता देसले, वार्ड अध्यक्ष दिपक दोरलेकर, वार्ड अध्यक्षा भारती बुटाला, बचतगटप्रमुख रेखा तरे, रवी महाडिक, स्वाती चौधरी, मनिषा ठाणगे, शालिनी मेंढे, किरण सिंग, अविनाश आंधळे, इतर कार्यकर्ते प्रचारात उतरले आहेत.
No comments:
Post a Comment