मतदानाच्या तोंडावर घाटकोपर पश्चिम मध्ये धमक्यांचे सत्र - विरोधी उमेदवारांचा आरोप !
घाटकोपर, (केतन भोज) : घाटकोपर पश्चिम विधानसभेमध्ये भाजपचे राम कदम,मविआचे संजय भालेराव तर मनसेचे गणेश चुक्कल अशी तिरंगी लढत होत आहे. याठिकाणी अत्यंत चुरशेची तिरंगी लढत होत असताना, १५ वर्ष आमदार राहिलेल्या उमेदवारांकडून मनसेच्या व महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे काम करत असलेल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना माझ्या सोबत ये नाही तर तुला बघून घेईन, तुझे मंडळाचे सेड तोडेल, घरी येऊन तुला बघून घेईल अशा प्रकारच्या धमक्या येत असल्याचा आरोप मनसे व मविआच्या उमेदवारांनी घाटकोपर पश्चिम याठिकाणी १५ वर्ष आमदार राहिलेल्या आणि आता उमदेवार असलेल्यांवर केला आहे. हिंमत असेल तर आमच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना काय धमक्या आम्हाला द्या आम्ही उमेदवार आहोत, गोरगरिबांना काय त्रास देताय आमच्याशी लढा असे आवाहन दोन्ही उमेदवारांनी याठिकाणी धमक्या देणाऱ्या उमेदवाराला आपल्या प्रचार सभेच्या भाषणांमधून दिला आहे. तसेच जर कोणाला धमकी येत असेल तर आम्हाला फोन करा आम्ही बघून घेतो असा विश्वास मनसे व मविआच्या दोन्ही उमेदवारांनी आपल्या प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
No comments:
Post a Comment