Monday 22 July 2024

जयेश ट्रेनिंग तायक्वादो अकॅडमीच्या खेळाडूंची साऊथ कोरिया आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दमदार कामगिरी !!

जयेश ट्रेनिंग तायक्वादो अकॅडमीच्या खेळाडूंची साऊथ कोरिया आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दमदार कामगिरी !!

मुंबई (शांताराम गुडेकर)

          साऊथ कोरिया मधील तायक्वादो वॉन जेलबोक दो मुज्जू या शहरात दिनांक १८ ते २३ जुलै २०२४ पर्यंत सुरु असलेल्या १७ व्या वर्ल्ड तायक्वादो कल्चर एक्सपो आंतरराष्ट्रीय पुमसे आणि क्युरोगी स्पर्धेत मुंबईच्या जयेश ट्रेनिंग तायक्वादो अकॅडमीच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत भारताचा तिरंगा फडकवला. या स्पर्धेत २२ देशातील अडीच हजार खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या आंतरराष्ट्रीय तायक्वादो स्पर्धेत जयेश ट्रेनिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी ८ सुवर्ण, ८ रौप्य आणि ४ कांस्य पदकाची कमाई केली. भारतीय संघाचे प्रतिनिधित्व जयेश ट्रेनिंग तायक्वादो अकॅडमीचे प्रमुख प्रशिक्षक जयेश वेल्हाळ यांनी केले. तर मुंबई विभागातील प्रशिक्षण केंद्रात सह प्रशिक्षक निशांत शिंदे, यश दळवी, चंदन परीडा, स्वप्नील शिंदे, फ्रँक कनाडीया, कृपेश रणक्षेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कसून सराव घेण्यात आला होता त्याचे परिणाम स्वरूप जयेश ट्रेनिंग तायक्वादो अकॅडमीच्या खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांनी उत्तम कामगिरी बजावल्याचे मुख्य प्रशिक्षक जयेश वेल्हाळ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.

No comments:

Post a Comment

पुन्हा एकदा राम का नव्याने श्री गणेशा का दादापण होणार सिद्ध !! घाटकोपर पश्चिम : तिरंगी लढत  घाटकोपर, (केतन भोज) : विधानसभा निवडणुकीसाठी २० न...