Monday 22 July 2024

"झाडे लावा.. झाडे जगवा" संदेश देत एकदंत क्लासेस तर्फे गुरु पौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण !!

"झाडे लावा.. झाडे जगवा" संदेश देत एकदंत क्लासेस तर्फे गुरु पौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण !!

** एकदंत क्लासेसच्यावतीने विरारमध्ये गुरुपौर्णिमा निम्मित आगळा वेगळा उपक्रम

विरार (शांताराम गुडेकर /मोहन कदम) :
             विरार शहरातील गेली ११ वर्ष १००% निकालाची परंपरा जपणारा विरार परिसरामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्नशील असणारा आणि यशस्वी झालेल्या  एकदंत क्लासेसतर्फे गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला क्लास संचालक श्री.प्रदिप तोरस्कर,क्लासेसचे शिक्षक विलास पडवळ, संजय पैकडे, संदीप गराटे, सौ नीता शिर्के, शिक्षक सौ. स्वरा अपराज, मेबल बंगेरा, अर्पिता बंदीवाडकर,अनिता रापोल, मीनल चोरगे, सौ.श्रीलता टीचर आणि संपूर्ण एकदंत क्लासेसचे शिक्षक टीम एकदंत क्लासेसच्या विद्यार्थ्यांसहित उपस्थित होते. पर्यावरणाचे संवर्धन, संगोपन ही जाणीव मनात बाळगून हा उपक्रम क्लासेस तर्फे राबविण्यात आला.

           वृक्षसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे.बदलत्या निसर्गाने मानवावर विचार करण्याची वेळ आणली आहे. आपण एकीकडे कल्पनेच्या पलीकडे गगनभरारी घेतली, प्रगती साध्य केली; परंतु आपल्या कृतीने पर्यावरणाचा क्षय होतोय याकडे मात्र दुर्लक्ष केले. याचेच परिणाम आज आपण पाहत आहोत. मानवाने आपल्या अतिरेकी महत्त्वाकांक्षेसाठी सिमेंटची जंगलं वसवली. मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली. याच्याच परिणामी ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न आज जगाला भेडसावत आहे. वातावरण बदलामुळे पावसाची अनिश्चितता वाढलीय. जागतिक तापमानातील वाढीमुळे पृथ्वीवरील मानवाचं, सजीवांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. वाढती लोकसंख्या, वाहनांचा अति वापर, त्यामुळे निर्माण होणाºया प्रदूषणामुळे शहरात श्वास घेणं कठीण झालंय. शुद्ध हवा, ऑक्सिजन हवी असेल तर झाडांशिवाय पर्याय नाही. वृक्ष आपल्याला फक्त पाने, फुलेच देत नाहीत, तर आपल्याला जगण्याची ऊर्जा देतात. नवी आशा देतात. उमेद देतात. प्रत्येक नागरिकांनी आपल्या व आपल्या आवडत्या व्यक्तीच्या वाढदिवसानिमित तसेच लग्न वाढदिवसानिमित आणि आपल्या मुलांच्या वाढदिवसानिमित तसेच आवडत्या व्यक्तीच्या स्मरणार्थ दरवर्षी फक्त ५ झाडे लावली तर पर्यावरणास सहाय्यकरी ठरणाऱ्या वृक्षांची वाढ होऊन निसर्ग समतोल राखण्याचे पुण्य पदरात पडेल. शिवाय देशकार्यात सहभागी झाल्याचा आनंद मिळेल. म्हणूनच वृक्षसंवर्धन काळाची गरज आहे. वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करा असे आवाहन यानिमित्ताने एकदंत क्लासेस तर्फे संचालक प्रदीप तोरस्कर यांनी करत वृक्षारोपण कार्यक्रमाची सांगता केली.

No comments:

Post a Comment

राम कदम यांचे सुपुत्र ओम राम कदम यांच्या हस्ते विक्रोळी पार्कसाईट येथील निवडणुक कार्यालयाचे उद्घाटन !

राम कदम यांचे सुपुत्र ओम राम कदम यांच्या हस्ते विक्रोळी पार्कसाईट येथील निवडणुक कार्यालयाचे उद्घाटन ! विक्रोळी, (केतन भोज) : घाट...