Monday, 22 July 2024

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वाडा येथे विविध उपक्रम !!

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वाडा येथे विविध उपक्रम !!

वाडा, प्रतिनिधी : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री  अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वाडा ग्रामीण रुग्णालय येथील रुग्णांना फळ, बिस्किट्स व पाणी बाटली साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच भाजी विक्रेत्यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. 

यावेळी पालघर जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती रोहिणीताई शेलार, शिवसेनेच्या जि.प. सदस्या मिताली बागुल, माजी गटनेते नरेश आकरे, पंचायत समिती उपसभापती जगदीश पाटील, राष्ट्रवादीचे वाडा तालुका अध्यक्ष जयेश शेलार, आमदार दौलत दरोडा यांचे स्वीय सहाय्यक रोहिदास शेलार, युवक तालुका अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, युवक कार्याध्यक्ष नितीन देसले, उपाध्यक्ष वैभव पटारे,  महिला आघाडी जान्हवी पाटील, परळी सरपंच भारती पवार यांसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

शाहीर जयंत चव्हाण (बापू) कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !!

शाहीर जयंत चव्हाण (बापू)  कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !! मुंबई (शांताराम गुडेकर)               बालपणापासून गायन व...