Friday, 12 July 2024

विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष माध्यमिक विद्यालयात पार पडली शालेय निवडणूक !!

विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टचे कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष माध्यमिक विद्यालयात पार पडली शालेय निवडणूक !!

*** विद्यार्थी झाले मतदार अन् शिक्षक झाले शालेय निवडणूक अधिकारी 

विरार प्रतिनिधी / पंकज चव्हाण

लोकशाही सुदृढ करायची असेल तर निवडणूक स्वच्छ व पारदर्शक होण्यासाठी  शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना लोकशाही शिक्षण देण्याची आवश्यकता असते. शालेय शिक्षणात नागरिकशास्त्र शिकवलं जातं. पण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून नागरिकशास्त्र शिकवण्याचा यशस्वी प्रयोग यावेळी उत्कर्ष विद्यालयात करण्यात आला.

विद्यार्थ्यांमध्ये राजकारणाबाबत निर्माण झालेली उत्सुकता आणि विद्यार्थ्यांना लोकशाहीचा अर्थ समजून मतदान हक्काचे प्रबोधन व्हावे याकरिता शाळेत निवडणूक प्रक्रिया, मतमोजणी व शपथविधीचा उपक्रम राबविण्यात आला.

विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कशी असते हे समजून घेण्यासाठी  उमेदवारी अर्ज भरणे, अर्जाची छाननी करणे, माघार घेणे, प्रचार करणे आणि प्रत्यक्ष मतदान अशा सर्व प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडण्यात आल्या.

शिक्षकांनी मतदान अधिकाऱ्याची जबाबदारी सांभाळली. मतदार यादी म्हणून वर्गनिहाय याद्या केल्या. त्यावर मतदान केल्याची विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेतली. मतदान केल्यावर विद्यार्थ्यांच्या बोटास शाई लावण्यात आली.

गुरुवार दि. ०४ जुलै २०२४ रोजी दुपारी १ ते ५ या कालावधीत शालेय मतदान घेण्यात आले तर शुक्रवार दि. ०५ जुलै २०२४ रोजी  मतमोजणी करण्यात आली. दि. ०८ जुलै २०२४ रोजी निकाल जाहीर करून विद्यार्थी मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री, स्वच्छता मंत्री, आरोग्य मंत्री, क्रीडा मंत्री, सांस्कृतिक मंत्री,शिस्त मंत्री या पदांसाठी शपथविधी पार पाडण्यात आला.

या शालेय निवडणूक प्रक्रियेमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय श्रीमती. मुग्धा लेले, शाळेच्या उपमुख्याध्यापिका सन्माननीय श्रीमती. चित्रा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक श्री. योगेश सुळे व श्री. पवन हळदीपुरकर यांनी ही शालेय निवडणूक यशस्वीपणे पार पाडली. या शालेय निवडणूक प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, एकात्मता व सहकार्य वाढीस लागले.

निवडून आलेल्या शालेय प्रतिनिधींच्या माध्यमातून आपल्या शालेय समस्या सुटतील याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली.

No comments:

Post a Comment

महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड प्रचंड बहुमताने निवडून द्या - खासदार रवी किशन

महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड प्रचंड बहुमताने निवडून द्या - खासदार रवी किशन  कल्याण, सचिन बुटाला : कल्याण पूर्वेत खासदार रवी...