Monday, 15 July 2024

उत्कर्ष विद्यालयात आगळी वेगळी हरितवारी !!

उत्कर्ष विद्यालयात आगळी वेगळी हरितवारी !!

विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण

       आषाढ महिन्यात वेध लागतात ते आषाढवारीचे. मात्र विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या उत्कर्ष विद्यालयात नुकताच आगळी वेगळी आषाढी वारी काढण्यात आली. आषाढी वारी ला निसर्गपूजेची जोड देऊन पर्यावरणपूरक जनजागृती करणारी हरितवारी काढण्यात आली. उत्कर्ष पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने निसर्गपूजा, झाडांचे आपल्या जीवनातील महत्त्व सांगून यादिवशी विद्यार्थ्यांच्या मदतीने प्रत्यक्ष वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी याच परसबागेतील कडीपत्ता, कोथिंबीर, मिरची यांचा वापर केला जातो. या हरितवारीचे पालकांनी कौतुक केले. पूर्व प्राथमिक विभागाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले.

            प्राथमिक विभागात आषाढ दिंडीचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. मुग्धा लेले व उपमुख्याध्यापिका श्रीमती. चित्रा ठाकूर यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून दिंडीची सुरुवात केली. कु. वंश मोरे याने विठ्ठलाचे तर कु. योगेश्वरी सोनवणे हिने रखुमाई चे रुप साकारले होते. कु. कुंज तरे, कु.चिन्मय दुडये, कु. तेजस पालव आणि कु. हिताली राऊत आणि अनुक्रमे ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई साकारल्या होत्या. पूर्व प्राथमिक व प्राथमिक  विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. भक्ती वर्तक यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती. वंदना चित्रे, श्री. महेश पाटील, श्रीमती. तृप्ती राऊत, श्री. किरण राणे, श्रीमती. आदिती भोईर यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले. सर्वांचे आभार श्रीमती. वृषाली पाटील यांनी मानले. यावेळी सर्व प्राथमिक विभागाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

साहित्य संघात "मुक्काम पोस्ट शाळा" नाट्यप्रयोगाचे आयोजन !!

साहित्य संघात "मुक्काम पोस्ट शाळा" नाट्यप्रयोगाचे आयोजन !! ** अनाथ - गरजू विदयार्थ्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी निधीसंकलनाचा उपक्रम ...