भडवळे ग्रामविकास संघटना पुणे विभाग आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा व वर्धापनदिन साजरा !!
मुंबई - ( दिपक कारकर )
गेली अनेक वर्षे कला,क्रीडा,शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात व गावातील जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान असणारी संघटना म्हणजेच दापोली तालुक्यातील भडवळे ग्रामविकास संघटना होय.नुकताच संघटनेचा वर्धापन दिन पुणे विभाग वतीने संपन्न झाला.ह्या भव्य - दिव्य सोहळ्यात विद्यार्थी गुणगौरव सोहळा, विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर, महिलांसाठी हळदी-कुंकु समारंभ व स्नेह मेळावा असे भरगच्च स्वरूप होते.कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलित करुन, छ.शिवाजी महाराजांची आरती करुन करण्यात आली. कार्यक्रम अध्यक्ष स्थानी अशोकजी रेवाळे (ग्रामीण अध्यक्ष, मा.सरपंच भडवळे), गुणवंत विदयार्थी यांना शैक्षणिक मार्गदर्शक संजयजी भैलूमे सर (मा. मुख्याध्यापक क.भा.हिरे हायस्कूल), उदयजी जगताप - (वर्ल्ड गिनीज रेकॉर्ड होल्डर) यांनी केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून सरस्वतीताई शेंडगे (मा.उपमहापौर पुणे मनपा), प्रशांत तपस्वी (नाट्य व सिने अभिनेते), विजयजी नाचरे-
(उप सरपंच,भडवळे), लक्ष्मणजी खांबे -(अध्यक्ष,तंटामुक्ति समिती, भडवळे), राजाभाऊ शेंडगे - (सामाजिक कार्यकर्ते), प्रियांकाताई शेंडगे-शिंदे, (सरचिटणीस,भाजपा महिला मोर्चा, पुणे शहर), सुरेशजी जाधव-(अध्यक्ष,मुंबई विभाग ) ग्रामीण, मुंबई आणि पुणे विभागाचे पदाधिकारी, भडवळे गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी पुणे विभागाचे अध्यक्ष-विजयजी शिंदे, उपाध्यक्ष-मनोहर नाचरे, खजिनदार-विनोद नाचरे उप खजिनदार-कैलास नितोरे, महिला अध्यक्षा-वैशाली नितोरे व महिला पदाधिकारी यांनी अथक मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटनेचे सचिव तुषार खांबे तर प्रस्ताविक माजी सचिव विशाल नाचरे यांनी केले व आभार प्रदर्शन माजी खजिनदार विनायकजी शिंदे यांनी केले.ह्या अतिशय स्तुत्य उपक्रमाचे विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment