Saturday 10 August 2024

विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित उत्कर्ष विद्यालय प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागाच्या वतीने आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा !!

विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित उत्कर्ष विद्यालय प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागाच्या वतीने आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा !!

वसई, प्रतिनिधी : आदिवासी समाजाच्या हक्कांचे रक्षण आणि जागरूकता निर्माण होण्यासाठी दिनांक ९ ऑगस्ट हा दिवस विश्व आदिवासी दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित उत्कर्ष विद्यालय प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागाच्या वतीने आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.

यावेळी विद्यार्थ्यांनी विविध  संस्कृतीची ओळख करून देणारे अतिशय आकर्षक तारपा नृत्य सादर केले. यावेळी विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आदिवासी समाजाची पारंपारिक वारली चित्रे काढली. 

श्रीमती. ज्योत्स्ना जाधव यांनी विद्यार्थ्यांना आदिवासी दिनाविषयी माहिती सांगितली. तसेच श्रीमती. वर्षा पाटील व श्रीमती. आदिती भोईर यांनी आदिवासी समाजाचे पारंपारिक गीत सादर केले. या कार्यक्रमासाठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती भक्ती वर्तक मॅडम तसेच इतर शिक्षकवृंद उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

नवी मुंबई ऐरोली येथील कोळी भवनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न !!

नवी मुंबई ऐरोली येथील कोळी भवनाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न !! *कोळी भवनाला निधी कमी पडून देणार नाही*         *-...