दृष्टीहिन मुलींसाठी धनंजय गावडे बनले देवदुत....
नालासोपारा, प्रतिनिधी :- आपण समाजामध्ये अनेक दिव्यांग व्यक्ती पाहतो. अंध, मूकबधीर, हात किंवा पायाने अधू असलेला अनेक व्यक्ती समाजात आजूबाजूला वावरताना दिसतात. त्यांचं जगणं सर्वसामान्यांसारखं नसतं. अपंगत्वावर मात करुन त्यांना समाजात राहायचं असत नालासोपारातील दृष्टीहीन आदिती केकाणे व यशस्वी शेट्ये या दोन्ही मुलींना शाळेतील प्रवेशासाठी दिव्यांग प्रमाणपत्राची नितांत गरज होती अनेक वर्ष प्रयत्न करून हि दिव्यांग प्रमाणपत्र काढण्यास अडचण येत होती. याबाबत स्वराज अभियान अध्यक्ष धनंजय गावडे यांना सांगताच त्या दोन्ही मुलींना दिव्यांग प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अडचणीच्या वेळी केलेल्या मदतीचे समाजातुन कौतुक होत आहे. ही मदत नक्कीच सर्वांना प्रेरणा देणारी आहे.
दिव्यांग व्यक्तींना दररोज विविध समस्यांना सामोरे जावे लागते.
दिव्यांग नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांच्या तुलनेत मिळणाऱ्या सोयी सुविधांकडे दुर्लक्ष केले जातं. असं असताना दिव्यांग बांधवांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहुन
दिव्यांगानाही सक्षम करून त्या मुख्यजजग प्रवाहात आणण्यासाठी मदत करणार असल्याचे स्वराज अभियान अध्यक्ष धनंजय गावडे यांनी आपली भावना व्यक्त केली.
यावेळी शिवसेना महिला तालुका संघटक अश्विनी चव्हाण, महिला शहरप्रमुख रूचिता नाईक, शहरप्रमुख रोहन चव्हान उपस्थित होते.
No comments:
Post a Comment