Wednesday 21 August 2024

वर्ल्ड वाईड (जागतिक) ह्यूमनराइट्स ए.एफ.आणि लायन्स क्लब ऑफ मुंबई यांच्यातर्फे परळ येथे शालेय साहित्य वाटप !

वर्ल्ड वाईड (जागतिक) ह्यूमनराइट्स ए.एफ.आणि लायन्स क्लब ऑफ मुंबई यांच्यातर्फे परळ येथे शालेय साहित्य वाटप !

मुंबई (शांताराम गुडेकर)
           वर्ल्ड वाईड (जागतिक) ह्यूमनराइट्स ए.एफ.आणि लायन्स क्लब ऑफ मुंबई मिडटाउन लायन्स क्लब्स इंटरनॅशनल जिल्हा 3231 A1 यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २०/८/२०२४ रोजी परेल, पोस्ट गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मुंबई येथे प्रमुख पाहुणे मुंबईचे माजी नगरपाल, लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3231A1 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2023 2024 चे लायन डॉ.जगन्नाथराव हेगडे आणि WHRAF चे राष्ट्रीय अध्यक्ष, लायन्स क्लब आँफ मुंबई मिडटाऊन डिस्ट्रिक 3231A1 चे फर्स्ट व्हॉइस प्रेसिडेंट लायन जितेंद्र दगडू (दादा) सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेच्या वतीने गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या व पेन वाटपाचा कार्यक्रमपार पडला. याप्रसंगी  WHRAF चे जनरल सेक्रेटरी अमोल वंजारे महाराष्ट्र सचिव सौ.ज्योतीताई भोसले, मुंबई जनरल सेक्रेटरी सौ.प्रमिला अडसूळ, मुंबई सेक्रेटरी महेश आंब्रे, नंदकुमार बागवे, मुंबई सहसचिव साक्षात म्हात्रे, छत्रपती मराठा साम्राज्य संघटना एडमिन अभिजीत  ढेरे, शिवसेना शाखाप्रमुख २०३ मिनार नाटळकर, महिला शाखा समन्वयक सौ.दिव्या बडवे, उपशाखा संघटिका अनिता मांजरेकर, गटप्रमुख निलेश बागवे, हिंदुस्तान माथाडी आणि जनरल कामगार सेनेचे मुंबई चिटणीस लितेश केरकर, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष राजकुमार कानोजिया, कार्याध्यक्ष दिनेश लोखंडे, सचिव संचित राजपूत, पारस कनोजिया, सुमित येरम, समाजसेवक दिलीप वरेकर, ज्येष्ठ नागरिक, पालक व विद्यार्थी, स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...