Wednesday 21 August 2024

आज, उद्या एस.टी बस सेवा विशेष कार्यक्रमात मग्न ! अनेक गावातील प्रवाशांचे मात्र हाल !!

आज, उद्या एस.टी बस सेवा  विशेष कार्यक्रमात मग्न ! अनेक गावातील प्रवाशांचे मात्र हाल !!

** लाडक्या बहिणी रत्नागिरीला रवाना मात्र त्यांच्या मुलीना शाळेत जाताना करावी लागली पायपीट 

कोकण (शांताराम गुडेकर)
            एसटीची सेवा "गाव तेथे एसटी", "रस्ता तेथे एसटी" या ब्रीदवाक्यानुसार खेड्यापासून शहरापर्यंत विस्तारलेली आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. अनेक गाव,वाड्या आणि खेड्यापासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी हक्काचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. आजारी व्यक्तींना खेड्यापासून तालुका आणि जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी हक्काचे आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. मात्र रापमतर्फे सोडण्यात येणाऱ्या-जाणा-या एस.टी बसेच ब-याचवेळा वेळेवर सोडल्या जात नसल्याने कोकणवाशीय मुंबईकरांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे खाजगी वाहतूक व्यवस्था जास्त प्रमाणात उपलब्ध आहे. ते या प्रवाशांकडून जास्त पैसे घेऊन लुटतात. जर खासगी गाडी बरोबर सुटतात मग एस.टी बस वेळेवर सोडण्यात का येत नाहीत असा संतप्त सवाल कोकणवाशीयांनी एस,टी महामंडळाला विचारला आहे. आज  बुधवार दि. २१ ऑगस्ट २०२४ आणि गुरुवार दि. २२ ऑगस्ट २०२४ रोजी देवरुख आगारातून विशेष कार्यक्रम साठी काही एस. टी. बस (४० बस फेऱ्या) रद्द करण्यात आल्याचा फलक देवरुख आगार, रत्नागिरी विभाग तर्फे लावण्यात आला आहे. संगमेश्वर तालुक्यातील बामणोली, ओझरे, कुंडी, आंगवली, सायले, सोनगिरी, बडद वाडी, आंबेड, वायगाने, फणसट, आंबवली, फणसवले आदी अनेक गावात जाणाऱ्या एस. टी बस रद्द होणार आहेत.त्यामुळे याचा नाहक त्रास विद्यार्थी वर्ग, कामगार वर्ग शिवाय हॉस्पिटल किंवा अन्य महत्वपूर्ण कामाला जाणाऱ्या लोकांना नक्कीच सहन करावा लागणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीत आले असून लाडकी बहीण योजनेचा औपचारिक शुभारंभ केला. लाडक्या बहिणींना घेऊन लाल परी रत्नागिरीत जरी गेली असली तरी त्याच वेळेस  शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे मात्र हाल झाले. त्यामध्ये लाडक्या बहिणीची मुलगी पण होती.

**** योजना कितीही जनतेच्या फायद्याची असली तरी त्याच्या शुभारंभाचा इव्हेंट करताना त्यामुळे सर्वासामान्यांचे हाल होणार नाही  याचा विचार का नाही होत?

             विशेष कार्यक्रमांसाठी एस. टी देण्यासाठी आमचा विरोध नाही. पण प्रवाश्याना होणाऱ्या गैरसोईचे काय? स्थानिक लोकप्रतिनिधी यासाठी काय सोय करणार का? कारण निवडणूक प्रचार असला की १००/१५० गाड्या मतदार संघात फिरतात मग आता ही सोय विशेष कार्यक्रमला किंवा प्रवाशी सेवेसाठी का उपलब्ध होत नाहीत. त्यासाठी एस. टी घेऊन गोरगरीब प्रवाशी यांना त्रास का असा सवाल प्रवासी प्रशासनला, लोकप्रतिनिधी, संबंधित विभाग यांना  विचारत आहे.
            आज  संगमेश्वर तालुक्यातील प्रवाशी यांना नाहक त्रास सहन करावा लागला. लाडक्या बहिणी रत्नागिरीला रवाना मात्र त्यांच्या मुलीना शाळेत जाताना पायपीट करावी लागली. तीन -चार तासचालत जावे लागले.आज‌ (दि. २१ ऑगस्ट) आघाडीच्या वतीने डेपो मॅनेजर यांना घेराव घालून जाब विचारला. यावेळी उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख बंडया बोरुकर, विधानसभा संघटक रोहन बने, माजी सभापती देवरुख अजित गवाणकर, शरद पवार गटाचे तालुका प्रमुख बाबा साळवी, पत्रकार संदीप गुडेकर, विधानसभा संघटक दत्ताराम लिंगायत, जिल्हा प्रमुख बारक्यासेट बने सर्व शिवसैनिक आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते, सर्व प्रवाशी यांनी डेपो मॅनेजर यांना जाब विचारला. ४० बस देवरुख डेपोतून या विशेष कार्यक्रमला गेल्या आहेत. ७५ पैकी त्या पैकी ३५ बस देवरुख डेपोत उपलब्ध आहेत. त्याचे नियोजन करून सर्व बस वेगवेगळ्या गावात सेवा देणार आहेत. आजच्या आज सर्व बस देवरुख डेपो परत मागवा आणि आजच्या आज विद्यार्थी, प्रवाशी, नोकरदार यांना प्रवास करणासाठी उपलब्ध करून द्या अशी मागणी केली. तसेच उद्या कोल्हापूर येथे देवरुख डेपोतून १५ बस रवाना होणार आहेत. त्या तात्काळ रद्द करा. आणि  पूर्वीप्रमाणे रेगुलर गाड्या सोडा. जर का असे झाले नाही आणि पायी प्रवास करताना किंवा खाजगी वाहनाने जाताना बदलापूर सारखा विषय घडला तर त्याला जबाबदार कोण? आगार व्यवस्थापक यांनी वेळेत योग्य निर्णय घेतला नाही तर गुरुवार दि. २२ ऑगस्ट २०२४ रोजी देवरुख डेपोला कुलूप लावण्यात येईल असा इशारा उद्धव ठाकरे गट तालुका प्रमुख संगमेश्वर बंड्या बोरुकर यांच्यासहित आघाडीच्या सर्व पदाधिकारी, प्रवासी यांच्यावतीने देण्यात आला आहे. त्याची दाखला घेऊन बस आता देवरुख डेपोतून सोडण्यात येत आहेत. डेपो मॅनेजर यांनी सांगितले की, आम्हाला आदेश होता मुख्यमंत्री यांचा लेखी म्हणून आम्ही आज (२१ ऑगस्ट) रत्नागिरीला बस सोडण्यात आल्या आहेत. डेपो मॅनेजर यांनी दाखल घेऊन आता पासून बस खेडे गावात सोडायला देवरुख डेपोतून सुरुवात केले आहे.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...