Wednesday 14 August 2024

संसदेत एकाच पक्षाचे ५४३ खासदार निवडून आले तरीही सविधान कुणालाही बदलता येणार नाही -- महेश पोहणेरकर

संसदेत एकाच पक्षाचे ५४३ खासदार निवडून आले तरीही सविधान कुणालाही बदलता येणार नाही -- महेश पोहणेरकर

मुंबई (शांताराम गुडेकर) :
 
          भारतीय संविधान बदलले जाणार अशी अफवा पसरविली जात आहे. हे फेक नॅरेटिव्ह संविधानाबद्दल अनास्था निर्माण करणारे आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांसाठी कार्य करत असताना समाजात दुही, अशांतता, आणि फेक नॅरेटिव्ह या बाबत समाजाने आणि समाजातील प्रबुद्ध वर्गाने सजग राहिले पाहिजे. संविधान कुणालाही बदलता येणार नाही. संसदेत एकाच पक्षाचे ५४३ खासदार निवडून आले तरी भारतीय संविधान कोणीही बदलू शकत नाही असा ठाम विश्वास विवेक विचार मंचचे कार्यवाह महेश पोहणेरकर यांनी व्यक्त केला आहे.
           भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शिवाजी हॉल, एसएनडीटी कॉलेज जवळ घाटकोपर (प) येथे विवेक विचार मंच, देव देश प्रतिष्ठान आणि सहयोगी संघटनांच्या वतीने अनुसूचित जाती, वंचित घटकांचे प्रश्न, भारतीय संविधान, आरक्षण, सामाजिक न्याय, तसेच अन्याय अत्याचाराच्या विविध घटना, शासकीय योजना, आणि धोरण या विषयावर आयोजित केलेल्या सामाजिक संवाद मेळाव्यात 
विवेक विचार मंचचे कार्यवाह महेशजी पोहनेरकर बोलत होते. यावेळी विचार पिठावर पूज्य भदंत वीरत्नजी महाथेरो, विवेक विचार मंचचे कोकण प्रांत, संयोजक जयवंतजी तांबे, विवेक विचार मंच मुंबई महानगर संयोजक डॉ.ओमप्रकाश गजरे, डॉ. वैभव देवगिरकर, अध्यक्ष देव देश प्रतिष्ठान, शरद कांबळे अनुसूचित मोर्चा मुंबई अध्यक्ष, ॲड.प्रल्हाद खंदारे कायदे तज्ञ, ॲड.संदीप जाधव कायदे तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते तानाजी कांबळे, आदी मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते.
            विवेक विचार मंच चे कार्यवाह महेश पोहनेरकर पुढे म्हणाले भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार, शेतकरी, वर्गासाठी आखलेली धोरणे आणि सकारात्मक बाबींचा प्रचार करण्याचे आणि संविधान साक्षरता हा विषय घेऊन मुंबईत 50 सामाजिक संवाद मिळावे आयोजित करण्यात आले असून समाजाचे प्रबोधन करण्याचा निर्णय विवेक विचार मंच ,देव देश प्रतिष्ठान आणि सहयोगी संघटनांनी घेतला आहे.

No comments:

Post a Comment

पारस काव्य कला,जनजागृती संस्थेतर्फे विविध पुरस्कार, काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन !

पारस काव्य कला,जनजागृती संस्थेतर्फे विविध पुरस्कार, काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन ! मुंबई (शांताराम गुडेकर) :              सामाजिक, ...