Wednesday 7 August 2024

जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी कलाकृतींच्या प्रदर्शनाचे आयोजन !!

जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी कलाकृतींच्या प्रदर्शनाचे आयोजन !!

पुणे, प्रतिनिधी : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (टीआरटीआय) येथे ९ ते १० ऑगस्ट या कालावधी आदिवासी हस्तकला प्रदर्शन व विक्री, खाद्यमहोत्सव व कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

प्रदर्शनाचे उदघाटन ९ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. या प्रदर्शनात राज्यातील विविध भागातील आदिवासी कलाकारांनी तयार केलेल्या बांबू, लाकडाच्या, कापडाच्या दैनंदिन वापराच्या व शोभेच्या वस्तू, वारली चित्रकला, खाद्यपदार्थ, रानभाज्या, वनऔषधे आदींचे प्रदर्शन व विक्रीसाठी स्टॉल उभारण्यात येणार आहेत. 

आदिवासी कलासंस्कृतीचे जतन, संवर्धन आणि प्रचार व प्रसार करणाऱ्या या प्रदर्शनास अधिकाधिक नागरिकांनी भेट द्यावी. आदिवासी कलाकारांनी तयार केलेल्या वस्तू खरेदी करून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन संस्थेच्या सहसंचालक चंचल पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

मनसेचे प्रमोद गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन !

मनसेचे प्रमोद गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन ! कोकण - ( दिपक कारकर )  अल्पवधीत सामाजिक क्षेत्रा...