Sunday, 4 August 2024

बॅटरी फवारणी यंत्र, कापूस साठवणूक बॅगसाठी अर्ज करण्याचे आवाहन !!

बॅटरी फवारणी यंत्र, कापूस साठवणूक बॅगसाठी अर्ज करण्याचे आवाहन !!

बुलडाणा, प्रतिनिधी : राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबिया पिकाची उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन २०२४- २५ योजनेत बॅटरी संचालित फवारणी यंत्र व कापूस साठवणूक बॅग वितरीत करण्यात येणार आहे. याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेत वैयक्तिक शेतकरी यांना बॅटरी संचालित फवारणी पंप व कापूस साठवणूक बॅग अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या बाबीच्या लाभासाठी mahadbt.maharashtra.gov.in/Farmer पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करावे लागणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी कृषि विभागाचे कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक व मंडळ कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

घाटकोपर एन विभागामध्ये घाटकोपर पश्चिम मधील विकास कामांसाठी ४२७ कोटी रुपयाचा निधी आला होता तो गेला कुठे ?

घाटकोपर एन विभागामध्ये घाटकोपर पश्चिम मधील विकास कामांसाठी ४२७ कोटी रुपयाचा निधी आला होता तो गेला कुठे ?  ** घाटकोपर पश्चिम मध्ये बदल मी घडव...