Tuesday 13 August 2024

उल्हासनगर शहरात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची मनमानी ! कारवाई होण्याची नाही भीती !!

उल्हासनगर शहरात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची मनमानी ! कारवाई होण्याची नाही भीती !!

उल्हासनगर, प्रतिनिधी : आज निर्वासितांचे शहर अशी ओळख पुसून उल्हासनगर शहराने औद्योगिक शहर अशी ओळख संपूर्ण देशात बनवली आहे. या सर्वात उल्हासनगर शहरातील सर्व समाजाचे मोठे योगदान असून आज शहरात नागरी वस्ती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. 

या शहराच्या महानगरपालिकेचा कारभार कायम वादग्रस्त राहीला असून, बेकायदेशीर बांधकामे, निकृष्ट दर्जाची कामे या संदर्भात उल्हासनगर शहरातील प्रहार जनशक्ती पक्ष व राष्ट्र कल्याण पार्टी यांनी आज उल्हासनगर महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या कारभाराविरुध्द आंदोलन केले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष व राष्ट्र कल्याण पार्टी यांनी आरोप केले की उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांची वर्षोनुवर्षांपासुन दुरावस्था असून यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते अनेक नागरिक या रस्त्यावर अपघात झाल्याने अपंग झाले तर काही मृत्युमुखी सुध्दा पडले असून अनेक नागरिकांना मणक्यांचे आजार झाले आहेत. या सर्वाला जबाबदार उल्हासनगर महापालिकेचे बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. तर महापालीका आयुक्त यांना पाठिशी घालत असून यात त्यांचे सुध्दा आर्थिक हितसंबंध असावेत अशी शंका येते या सर्वांची चौकशी व्हावी व तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

आयुक्त रत्यावरील खड्यांचे राजकारण करतांना दिसून येत आहे म्हणूनच आयुक्तांच्या भ्रष्टकारभाराच्या विरोधात प्रतिकात्मक निषेध प्रहार जनशक्ती पक्ष व राष्ट्र कल्याण पार्टीद्वारे उल्हासनगर मधील हिरा घाट येथे करण्यात आले . 

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे शहर अध्यक्ष प्रधान पाटील , श्याम भोईर, शरद पोळके, रूपेश शिर्के व राष्ट्र कल्याण पार्टीचे महासचीव श्री राहूल काटकर, श्री शैलेश तिवारी, प्रवीण के सी, गौरव पठारे व इतर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कृष्णा कदम याना समाजभूषण पुरस्कार जाहीर !!

कृष्णा कदम याना समाजभूषण पुरस्कार जाहीर !! मुंबई (उत्कर्ष गुडेकर) :          ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू रुग्णांना मदतीचा हात...