Thursday 22 August 2024

कळंबटच्या माजी विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी ; शाळेला दिली प्रेमरुपी अनोखी भेटवस्तू !!

कळंबटच्या माजी विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी ; शाळेला दिली प्रेमरुपी अनोखी भेटवस्तू !!

कोकण - ( दिपक कारकर )

"ही आवडते मज मनापासुनी शाळा, लाविते लळा ही जसा माऊली बाळा" अशी खऱ्या अर्थाने शैक्षणिक जडणघडण घडून आलेली शाळा विद्यार्थीरुपी पाखरांना कायमच आठवणीत राहते. शाळा सोडून कितीही वर्षे झाली तरी शाळेच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात कायम ताज्या असतात. तसेच शाळेतील मित्र-मैत्रिणींची आठवणही मनात असते. या आठवणी पुन्हा ताज्या व्हाव्यात, या उद्देशाने जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा कळंबट, ब्राह्मण-घवाळ ( ता. चिपळूण, जि.रत्नागिरी ) येथील सन - १९९८-९९ इ. सातवी बॅचसचे माजी विद्यार्थी एकत्र आले. 

तब्बल २४ वर्षांनी शाळेतील आपल्या वर्गात मित्र-मैत्रिणींसमवेत शाळेमध्ये एकत्र येत अनोखा उपक्रम हाती घेत जुने ऋणानुबंध पुन्हा ताजे केले. नुकतेच १५ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत शाळेसाठी भेटवस्तू म्हणून अत्यावश्यक असणाऱ्या अहुजा कंपनीचा परिपूर्ण साऊंड सिस्टम भेट दिला. शाळेतर्फे सर्व माजी विद्यार्थ्यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले, माजी विद्यार्थ्यांनी देखील शिक्षकांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सदर उपक्रमाला विद्यार्थी, पालकवर्ग, शिक्षक वृंद व वाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते. ह्या स्तुत्य उपक्रमाचे पंचक्रोशीतून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...