Wednesday 21 August 2024

कुणबी समाज तळवडे विभाग आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !!

कुणबी समाज तळवडे विभाग आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !!

*१०० रक्तदात्यांनी रक्तदान करून जपली सामाजिक बांधिलकी*

मुंबई - ( दिपक कारकर )

"रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान" ह्या बोधवाक्याने प्रेरित असणाऱ्या व आपले रक्तदान हे कोणाला तरी जीवनदान देऊ शकते,अशा सामाजिक भावनेच्या विचारधारेने कुणबी समाजोन्नती संघ,मुंबई - शाखा तालुका म्हसळा संलग्न तळवडे विभाग कमिटी, युवक मंडळ महिला मंडळ आणि श्री कृष्ण मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.१८ ऑगस्ट २०२४ रोजी  श्रीकृष्ण हॉल, बोरिवली ( पूर्व ) येथे विभागीय अध्यक्ष राकेशजी पेंढारी यांच्या मातोश्रींचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्यामुळे उपाध्यक्ष सतेजजी शिगवण यांच्या अध्यक्षतेखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन घेण्यात आले होते. सदर शिबिराला तळवडे विभागातील १० गावातून जवळपास १०० रक्तदात्यांनी रक्तदान करून या कार्यक्रमाला यशस्वी केले आहे. यासाठी युवक मंडळ अध्यक्ष विश्वास गायकर, सचिव ओमकार धावडे, खजिनदार किरण पवार तसेच संपूर्ण युवक मंडळ कमिटी यांनी घेतलेली मेहनत सोबत विभागीय कमिटी, क्रिडा समिती आणी महिला मंडळानी महत्वाची भूमिका बजावली.

अनेक क्षेत्रात प्रतिवर्षाला नावीन्य उपक्रम घेणाऱ्या उपरोक्त मंडळाच्या रक्तदान ह्या स्तुत्य उपक्रमाला तालुका सल्लागार अशोकजी भुवड यांनी सपत्नीक आणि ठाकरोली विभागाचे माजी अध्यक्ष रमेशजी शिंदे आणी रक्तदान करून विशेष सहकार्य  केले. दरम्यान तालुका कार्यकारिणी उपाध्यक्ष  महेशजी शिर्के यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. तालुका अध्यक्ष - महेंद्र टिंगरे , सचिव - राजुजी धाडवे, उपाध्यक्ष अनिलजी बांद्रे, हेमंतजी रामाने, सहचिटणीस - कल्पेशजी जाधव, सहखजिनदार - जयदेश चव्हाण, प्रवीण भोगल, युवक कमिटी सचिव- उमेशजी पोटले, सल्लागार - बबनरावजी उंडरे,नामदेवजी धोकटे  मनोहरजी पाटील, राजारामजी कासरुंग, अशोकजी भुवड, तालुका महिला मंडळ अध्यक्षा नेहाताई खापरे उपाध्यक्षा-शिल्पा रामाने, सुविधा कासरुंग व रायगड मी मराठी प्रतिष्ठानचे शिलेदार ही उपस्थित होते. सदर उपक्रमाचे अनेक स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...