Friday 23 August 2024

कल्याण, भिवंडी उल्हास नगर येथील शिधावाटप अधिकारी यांच्या भ्रष्टाचारची तात्काळ कारवाई न झाल्यास भीम सेना तीव्र आंदोलन करेल - श्री. प्रकाश पवार

कल्याण, भिवंडी उल्हास नगर येथील शिधावाटप अधिकारी यांच्या भ्रष्टाचारची  तात्काळ  कारवाई न झाल्यास भीम सेना तीव्र आंदोलन करेल - श्री. प्रकाश पवार  
_____________________________
कल्याण शिधावाटप अधिकारी यांच्या कार्यालयापुढे २३ ऑगस्ट २०२४  पासून भिम सेनेचे ठाणे जिल्हा सचिव बालाजी पात्रे यांचे उपोषण सुरु

ठाणे, (प्रतिनिधी) : ठाणे जिल्ह्यामध्ये दलित, मागासवर्गीय, मजूर, कामगार तसेच चाळीमध्ये मध्ये राहणाऱ्या गोरगरीब कुटुंबांना शासनाच्या वतीने सरकारी राशन दुकानाच्या मार्फत स्वस्त भावामध्ये शिधापत्रिकेच्या नोंदणी नुसार अन्नधान्य पुरविणाऱ्या योजनेमध्ये तसेच नवीन शिधापत्रिका नोंदणी  करताना कल्याणचे दत्तात्रेय नांगरे, भिवंडीचे रवि गर्गे, उल्हासनगरचे होलमाने हे शिधावाटप अधिकारी हे त्यांच्या शासकीय पदाचा दुरुपयोग करून कार्यालयीन कामकाजामध्ये प्रचंड प्रमाणात भोंगळ कारभार, भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार करत आहेत, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे, तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्क व अधिकारापासून वंचित राहण्याची पाळी आली आहे. तेव्हा कल्याण, भिवंडी, उल्हासनगर येथील शिधावाटप अधिकारी यांच्या भ्रष्टाचाराची आणि भोंगळ कारभाराची कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी भीमसेनेचे ठाणे जिल्हा सचिव श्री. बालाजी पात्रे यांनी माननीय ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे दिनांक १९/०८/२०२४ रोजी एका निवेदनातून  केलेली आहे. कल्याण, भिवंडी, उल्हासनगर येथील भ्रष्टाचारी शिधावाटप अधिकारी  यांचेवर त्वरित कारवाई न झाल्यास दिनांक २३/०८/२०२४ पासून कल्याण शीधावाटप अधिकारी  यांचे कार्यालय क्रमांक ३८ मुरबाड रोड कल्याण पश्चिम यांचे कार्यालय पुढे सदर भोंगळ कारभार, भ्रष्टाचाराचे निषेधार्थ बेमुदत आमरण उपोषण आंदोलनास भीम सेनेचे ठाणे जिल्हा सचिव श्री बालाजी पात्रे हे बसले  आहे.

शिधावाटप अधिकारी ३८, राणी मेन्शन, मुरबाड रोड कल्याण, शिधावाटप अधिकारी ३७ कार्यालय भिवंडी, शिधावाटप अधिकारी ४०(फ) शिधावाटप कार्यालय उल्हासनगर यांनी आपल्या शासकीय पदाचा करून या कार्यालया अंतर्गत येणाऱ्या कामकाजामध्ये भोंगळ कारभार ,‌भ्रष्टाचार खुलेआम राजरोसपणे करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार चालविलेला आहे. सदर शिधावाटप अधिकारी हे एकाच  ठिकाणी गेल्या अनेक वर्ष पासून आहेत, शिधापत्रिका बनवण्याकरता येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना नवीन शिधापत्रिका देण्यासाठी चिरिमिरी घेतल्याशिवाय शिधापत्रिका बनवून दिल्या जात नाहीत. तसेच सदर शिधावाटप अधिकाऱ्यांमार्फत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. तेव्हा या तिन्ही शिधावाटत अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन कामकाजाची भोंगळ कारभाराची, आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराची कसून चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून  निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी भीमसेनेने दिलेल्या निवेदनातून केली आहे .सदर तीनही भ्रष्टाचारी शिधावाटप अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने कल्याण शिधावाटप अधिकारी कार्यालय क्रमांक ३८(फ) मूरबाड रोड कल्याण पश्चिम  यांच्या कार्यालयापुढे भ्रष्टाचार व भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ  दिनांक २३/०८/२०२४ पासून बेमुदत आमरण उपोषण आंदोलनाला भीमसेनेचे ठाणे जिल्हा सचिव श्री. बालाजी पात्रे  हे बसले आहे. सदर प्रकरणी विभागीय चौकशी न केल्यास गोरगरिबांना न्याय न मिळाल्यास भिमसेना ठाणे जिल्हाचे वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा भीमसेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रकाश पवार यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.

अधिक माहितीसाठी, संपर्क -
प्रकाश पवार, जिल्हा अध्यक्ष भीम सेना ठाणे,
मोब.8422041655


 

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...