लायन्स क्लब आँफ मुंबई मिडटाऊन डिस्ट्रिकच्या फर्स्ट वाईस प्रेसिडेंट पदी जितेंद्र सकपाळ यांची नियुक्ती !!
मुंबई (शांताराम गुडेकर) :
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक व जागतिक मानवाधिकार ए.एफ.चे राष्ट्रीय अध्यक्ष जितेंद्र सकपाळ यांचे सामाजिक क्षेत्रात तसेच आरोग्य क्षेत्रात सातत्याने चांगली कामगिरी केल्या बद्धल त्या कार्याची दखल घेऊन लायन्स क्लबस इंटरनॅशनल यांच्या माध्यमातून लायन्स क्लब आँफ मुंबई मिडटाऊन डिस्ट्रिकच्या फर्स्ट वाईस प्रेसिडेंट पदी निवड करण्यात आली आहे. मुंबईचे मा. नगरपाल, लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 2023-24 डॉ.जगन्नाथराव हेगडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन त्यांना नियुक्ती करण्यात आले. याप्रसंगी आरोग्य सेनेचे मुंबई संपर्क समन्वयक,महाराष्ट्र सरचिटणीस जागतिक मानवाधिकार ए.एफ.चे अमोल वंजारे, दिलीप वरेकर, हिंदुस्तान माथाडी आणि जनरल कामगार सेनेचे मुंबई चिटणीस लितेश केरकर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment