Tuesday, 20 August 2024

वाडा शहरातील श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार लवकरात लवकर करणे अत्यावश्यक !!

वाडा शहरातील श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार लवकरात लवकर करणे अत्यावश्यक !!

वाडा, प्रतिनिधी : केवळ धार्मिक नव्हे तर स्वातंत्र्य चळवळी पासून असलेले वाडा शहरातील विविध प्रकारचा सामाजिक आणि सांस्कृतिक ठेवा देखील जपणारे शहरातील श्रध्दास्थान श्रीराम मंदिर सध्या अत्यंत जीर्ण व धोकादायक अवस्थेत असून मंदिराच्या काही भागाची पडझड होण्यास सुरूवात झाली आहे.. 

साधारणपणे पाच दिवसांपूर्वी या मंदिराचा काही भाग जीर्ण झाल्याने कोसळला असून येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढला तर त्याच्या आजूबाजूचा भाग देखील सहज कोसळेल अशा अवस्थेत असल्याचे वरील फोटो पाहून सहज लक्षात येते.

काही दिवसांपूर्वी श्रीराम मंदिराचे जीर्णोद्धार करण्याचा संकल्प मंदिर विश्वस्त समितीने केला होता, पण मधल्या काळात याबाबत नंतर काय प्रगती झाली ते मात्र शहरातील रहिवाशांना अजूनही कळले नाही..

तरी कोणतीही मोठी दुर्घटना होण्यापूर्वी श्रीराम मंदीर विश्वस्त समिती ने सर्वांच्या सहकार्याने व सहभागाने मंदिर जीर्णोद्धाराचे काम तातडीने हाती घ्यावे अशी अपेक्षा शहरवासी करत आहेत.

No comments:

Post a Comment

विविध उपक्रम राबवून अजित दादा पवार यांचा वाढदिवस वाडा तालुक्यात साजरा !!

विविध उपक्रम राबवून अजित दादा पवार यांचा वाढदिवस वाडा तालुक्यात साजरा !! वाडा, प्रतिनिधी : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा र...