Tuesday 20 August 2024

पालशेत मध्ये सातत्याने वीजपुरवठा खंडित; महावितरण उपअभियंता गुहागर यांना मनसेचे निवेदन‌ !

पालशेत मध्ये सातत्याने वीजपुरवठा खंडित; महावितरण उपअभियंता गुहागर यांना मनसेचे निवेदन‌ !

गुहागर (पालशेत) : उदय दणदणे

गुहागर तालुक्यातील पालशेत आणि संपूर्ण पंचक्रोशीत गेले अनेक दिवस सातत्याने वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढत असून, वीज ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सदर बाबत येथील मनसे विभाग प्रमुख प्रसाद विखारे (पालशेत) यांनी दिनांक १९ ऑगस्ट २०२४ रोजी महावितरण, उपअभियंता गुहागर  यांच्याकडे निवेदन देत लक्ष वेधले आहे. सदर निवेदनात म्हटले आहे की, पालशेत येथे गेले काही दिवस सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असून,परिणामी येथील विद्यार्थी, व्यापारी वर्ग, नागरिकांना फार मोठया नुकसानीला सामोरे जावे लागत आहे, त्याचबरोबर येथे मोठ्या प्रमाणात गणपती कारखाने असल्याने त्यानाही मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे, गणेशोत्सव पूर्व येथील वीजपुरवठा सुरळीत होण्याबाबत  योग्य निर्णय घेऊन उपाययोजना करण्यात यावी अशी विनंती ही या निवेदनातून करण्यात आली आहे, निवेदन देताना मनसे विभाग प्रमुख प्रसाद विखारे, सुहास नरवणकर सह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...