Sunday 1 September 2024

गणित विषयात सृजनात्मक आनंद देणारी चित्रकलेची अनोखी स्पर्धा – प्राचार्या सौ. मुग्धा लेले

गणित विषयात सृजनात्मक आनंद देणारी चित्रकलेची अनोखी स्पर्धा – प्राचार्या सौ. मुग्धा लेले 

विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण

विरार पश्चिमेच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्टच्या कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष  कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विभागातर्फे चित्रांच्या माध्यमातून गणित विषयाची आवड निर्माण व्हावी म्हणून  चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.

या स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य आणि विज्ञान विभागातील जवळपास १४० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता आणि अत्यंत आकर्षक अशा भौमितिक आकृत्यांवर आधारित चित्रे काढली. 

या स्पर्धेसाठी प्राचार्या सौ. मुग्धा लेले, उपप्राचार्य प्रा. सुभाष शिंदे, वरिष्ठ शिक्षक श्री. मनोज वाणी यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख आणि शिक्षकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. प्रथम पाच क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये कनिष्ठ विभागातील गणित विषय विभागप्रमुख प्रा. सौ. भावना घरत आणि गणित विभागातील सर्व शिक्षकांनी विशेष मेहनत घेतली.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...