Sunday 1 September 2024

चोपड्यात रोटरी क्लबच्या माध्यमातून रानभाजी महोत्सव संपन्न !!

चोपड्यात रोटरी क्लबच्या माध्यमातून रानभाजी महोत्सव संपन्न !!

चोपडा, प्रतिनिधी : जंगलात व रानात महत्वाचे पोषणतत्त्व असणारे भाजी पावसाळ्यात उगत असते व त्या रानभाजींचे औषधी महत्व हे फक्त जंगलात किंवा खेड्यात राहणाऱ्या लोकांनाच माहिती असते परंतु शहरात उच्चशिक्षित व नोकरीसाठी आलेल्या लोकांना त्या भाजींचे महत्त्व नसते व या भाज्या  शरीरासाठी खूप उपयोगी असतात व त्या भाजी कशा तयार कराव्यात ह्या माहीत नसतात म्हणूनच तालुका कृषी अधिकारी कार्यालय चोपडा व रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्या संयुक्त विद्यमानाने *रानभाजी महोत्सव १ सप्टेंबर २०२४ वार रविवार  रोजी सकाळी १०.०० वाजता बस स्टॅन्ड शेजारी चोपडा* मा. आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. ह्यावेळी कृषी विभागाकडून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांची कृषी दैनंदिनी देऊन सत्कार करण्यात आला. 

तसेच या कार्यक्रमासाठी एकूण बारा गटांनी सहभाग घेतला होता व त्यात कटुरले, तांदळाची, बांबूची अंबाडी, चिवल, कीलू, घोळ, आलू यासारख्या इतर रानभाजी व औषधी भाजी त्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेल्या होत्या. त्यासोबत ह्या पदार्थांना कसे बनवायचे याबाबतचे सुद्धा प्रत्यक्षिक या ठिकाणी करण्यात आले व ह्या महोत्सवाच्या चोपड्यावाश्यांनी मोठ्या प्रमाणात उत्साहाने यशस्वीपने संपन्न झाला याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. ईश्वर सौंदाणकर रोटे, सचिव बी एस पवार रोटे, प्रकल्प प्रमुख तेजस जैन रोटे, सह प्रकल्प प्रमुख रोटे, चंद्रशेखर पाटील रोटे, नितीन अहिरराव, चंद्रकांत साखरे, विलास कोष्टी, पंकज बोरोले, चेतन टाटिया, अरुण सपकाळे, आशिष जयस्वाल, विलास एस पाटील, अमित बाविस्कर, विपुल छाजेड, प्रकाश बी पाटील, गौरव महाले व इतर सदस्य उपस्थित होते. त्याचप्रमाणे कृषी विभागाकडून आर एम पाटील, महेंद्र साळुंखे, जे यु सोनवणे, एम वाय महाजन, जितेंद्र सनेर, चेतन साळुंखे हे उपस्थित होते व एसटी महामंडळाकडून आगार प्रमुख श्री महेंद्र पाटील आगार व्यवस्थापक उपस्थित होते. या महोत्सवात उत्कृष्ट सादरीकरण करनाऱ्या गटास प्रथम क्रमांकाचे बक्षीस आशा महिला बचत गट खाऱ्या पाडा, द्वितीय क्रमांकाचे वृंदावन महिला शेतकरी गट चहाडी व तृतीय क्रमांकाचे बक्षीस चक्रधर शेतकरी महिला बचत गट चोपडा यांना पारितोषिक मिळाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भालचंद्र शिवाजी पवार यांनी केले

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमानुसार मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या १० नोंदणीकृत पदवीधरांच्या जागांकरिता २२ सप्टेंबर रोजी मतदान पार ...