Wednesday 25 September 2024

घाटकोपर येथील यशवंत खोपकर याना समाजभूषण पुरस्कार, तर मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थेला उत्कृष्ट संस्था पुरस्कार -२०२४ जाहीर !!

घाटकोपर येथील यशवंत खोपकर याना समाजभूषण पुरस्कार, तर मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थेला उत्कृष्ट संस्था पुरस्कार -२०२४ जाहीर !!

मुंबई (शांताराम  गुडेकर) :

         ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू व्यक्ती, विद्यार्थी, रुग्णांना, दिव्यांग, जेष्ठ नागरिक यांना सातत्याने मदतीचा हात देत वैद्यकीय उपचारसाठी सहकार्य करणाऱ्या विक्रोळी पार्क साईट येथील समाजसेवक, मुक्त पत्रकार याना यंदाचा २०२४ वर्षाचा  समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.पाक्षिक आदर्श रायगड यांच्या वतीने आयोजित पुरस्कार समारंभात यशवंत खोपकर यांना समाजभूषण पुरस्कार तर  विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या त्यांच्या शिवसेना (उबाठा) प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेला उत्कृष्ट संस्था पुरस्कार -२०२४ देऊन गौरविण्यात येणार असल्याचे आयोजक रमेश सणस, अविनाश म्हात्रे, शैलेश सणस यांनी सांगितले. पक्षिकेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी सांय ५ वाजता स्वामी समर्थ मंगल कार्यालय, रोटरी हॉल समोर, वीर बाजीप्रभू देशपांडे, वडवली विभाग, अंबरनाथ पूर्व येथे हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.या पुरस्कार साठी संस्थेने सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, साहित्य, वैद्यकीय, क्रीडा आदींचा समावेश केला आहे. सामाजिक कार्य क्षेत्रातून यशवंत खोपकर यांना समाजभूषण तर त्यांच्या संस्थेला उत्कृष्ट संस्था पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. गेली अनेक वर्ष यशवंत खोपकर आणि त्यांची संस्था पदाधिकारी, सदस्य, सभासद आणि हितचिंतक मुंबई सह मुंबई पूर्व -पश्चिम उपनगर, ठाणे, पालघर आणि रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना, दिव्यांग, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, विविध रुग्णालयात उपचार मिळवून देण्यासाठी सेवाकार्य करत आहेत. तसेच दिव्यांग रुग्णांना कृत्रिम हात पाय देऊन त्यांना स्वबळावर उभे करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. यशवंत खोपकर आणि मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्था याना या सेवा कार्यासाठी यापूर्वीही विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यांच्या याच कार्याचे  कौतुक म्हणून रविवार दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांना समाजभूषण पुरस्कारआणि उत्कृष्ट संस्था पुरस्कार -२०२४  देऊन गौरविण्यात येईल असे आयोजकांकडून सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...