Thursday 26 September 2024

पोलीस दलाच्या कामगीरीचे सर्वस्तरावरुन कौतुक !

पोलीस दलाच्या कामगीरीचे सर्वस्तरावरुन कौतुक !

प्रतिनिधि : अंबरनाथ
खंडणीसाठी अपहरण केलेल्या एका नामांकित बिल्डर च्या 20 वर्षिय मुलाची सुखरूप सुटका करून आरोपीनां बेड्या ठोकणाऱ्या अंबरनाथ शहरातील पोलीस दलाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे, यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार आरोपी यांनी नामांकित बिल्डरच्या मुलाचे गाडी आडवी लावून खंडणीसाठी अपहरण केले व 20 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. वरीष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरू करूण गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेत एका बाजूला तपास व दुसऱ्या बाजूला वाटाघाटी करण्याचे ठरविले गेले. आरोपीं सोबतच्या वाटाघाटीतून रूपये 2 कोटी खंडणीची रक्कम देण्याचे ठरले व आरोपी यांचे सांगितल्याप्रमाणे ओला कारमधून खंडणीची रकम पाठविण्यात आली, इकडे पोलीस दलाच्या समन्वयातून तांत्रीक तपासा द्वारे लोकेशन ट्रेस करण्यात आले परंतु सततच्या लोकेशन बदलण्यामुळे ओला कारचालक व आरोपीं मध्ये भेटीचे ठिकाण नक्की झालेच नाही, तसेच आरोपी यांनी तुमचा मुलगा घरी येऊन जाईल आम्हाला खंडणी नको असे सांगून फोन बंद करण्यात आला. वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेगार काही बरेवाईट तर करणार नाही असा गांभीर्य पूर्वक विचार करून आलेल्या मोबाईल फोनचा तांत्रिक तपास करत लोकेशन वर पोहचण्यात पोलीस अधिकारी यशस्वी झाले, घटनास्थळावरून 20 वर्षीय तरुणाची सुखरूप सुटका करून आरोपी यानां जेरबंद करून अटक करण्यात आली. 

या तपासामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे साहेब,अंबरनाथ पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळसकर साहेब, पोलीस उपनिरीक्षक दराडे साहेब व इतर पोलीस अधिकारी तसेच शिवाजीनगर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगत साहेब व इतर पोलीस अधिकारी यांनी मोलाचे योगदान दिले. 
सदर कामगिरीबद्दल ठाणे जिल्हा ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त पोलीस असोसिएशन व भटके विमुक्त सामाजिक संस्था यांचे वतीने विलास गायकवाड, वसंत पाटील व सुंदर डांगे यांनी पोलिस अधिकारी यांचे सत्कार केला.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...