Thursday 26 September 2024

मोफत प्रशिक्षणातुन स्वराज अभियान संघटना ठरत आहे महिलांसाठी मोठा आधार.....

मोफत प्रशिक्षणातुन स्वराज अभियान संघटना ठरत आहे महिलांसाठी मोठा आधार.....

*मोफत शिवणकाम, ब्युटी पार्लर, मेहंदी, हॉटेल मॅनेजमेंट, बँकीग कोर्सेस प्रशिक्षणाचे शुभारंभ*

नालासोपारा, प्रतिनिधी :- समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महिला सक्षम असणे, अत्यंत महत्त्वाचे असते. शिक्षण, आरोग्य, कला व रोजगार अशा विविध माध्यमातून महिला सक्षमीकरण व महिला सबलीकरण व्हावे, या उध्दिष्ठाने स्वराज अभियान संघटनेचे अध्यक्ष धनंजय गावडे यांच्या संयुक्त विद्यमाने नालासोपाऱ्यात युवती व महिलांसाठी मोफत शिवणकाम, ब्युटी पार्लर व मेहंदी, हॉटेल मॅनेजमेंट, बँकीग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. नालासोपारामधील होतकरू महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महिला शहर प्रमुख रुचिता नाईक यांनी केले.

महिला फक्त चुल, मुल,घर या चौकटीत न राहता तीच्या  कलागुणांना वाव  मिळावा. महिलांच्या हाताला काम मिळणे गरजेचे आहे त्यांना घरबसल्या चार पैसे कमावता यावे या हेतूने स्वराज अभियान अध्यक्ष धनंजय गावडे  यांच्या वतिने 
युवती व महिलांसाठी मोफत शिवण (टेलरींग) प्रशिक्षण, मेहंदी प्रशिक्षण व ब्युटी पार्लर प्रशिक्षण हॉटेल मॅनेजमेंट बँकींग कोर्सचे उध्दघाटन पत्रकार भालचंद्र होलम यांच्या हस्ते करण्यात आले.

महिलांच्या कौटुंबिक आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधी यातुन उपलब्ध होणार आहेत. महिनाभर प्रशिक्षण असणार आहे प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या महिला व युवतींना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

स्वराज अभियान चा माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम व सशक्त करून महिलांच्या एकत्रीकरणासाठी  स्वराज अभियान अध्यक्ष धनंजय गावडे पुढाकार घेत आहेत.
स्वराज अभियान संघटनेच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाचा घेतलेला संकल्प पुढे नेण्यासाठी सर्व महिलांना सहभागी होण्याचे आव्हान रूचिता नाईक यांच्या वतिने करण्यात आले. महिला शक्ती एकत्रित करण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी पत्रकार भालचंद्र होलम, सदानंद सावंत, महिला तालुका संघटक अश्विनी चव्हाण, रोहन चव्हान, नरेंद्र अचरेकर, रूचिदा माने, वंदना ढगे, आशा सातपुते, प्रियंका धनगर, फरमान शेख, हबीब खान, अदनान डाबरे, रेश्मा शेख प्रशिक्षक हार्दी बुदियाल, मनिषा गोहिल, भरत गोहिल, अमित नाईक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !

‘पिंक (गुलाबी) ई-रिक्षा’ वाटप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ! पुणे, प्रतिनिधी : महिला व बाल विकास विभागाच्यावतीने महिलांसाठी सुरू क...