Wednesday 2 October 2024

अखिल भारतीय कुर्मी (मराठा - कुणबी) क्षञिय महासभेचे राज्यस्तरीय अधिवेशन संभाजीनगर मध्ये 6 ऑक्टोबरला संपन्न होणार !

अखिल भारतीय कुर्मी (मराठा - कुणबी) क्षञिय महासभेचे राज्यस्तरीय अधिवेशन संभाजीनगर मध्ये 6 ऑक्टोबरला संपन्न होणार !
 
*🔸 केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी व महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर निरंजन प्रसाद यांसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार.*

संभाजीनगर, प्रतिनिधी : अखिल भारतीय कुर्मी (मराठा - कुणबी) क्षत्रिय महासभेचे महाराष्ट्र राज्य अधिवेशन येत्या 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 4.00 वाजता छत्रपती संभाजी नगर येथे संपन्न होत आहे.

या अधिवेशनासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, कुर्मी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. व्ही.एस.निरंजन, राष्ट्रीय महासचिव उमेश कुमार पटेल, राष्ट्रीय महिला अध्यक्षा लता ऋषी चंद्रकार,  राष्ट्रीय संरक्षक एल.पी. पटेल, राष्ट्रीय युवा अध्यक्ष धीरज पाटीदार तसेच मराठा सरदार लखुजी जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव, खासदार संदीपान भुमरे, खासदार डॉ. कल्याणजी काळे, आमदार  सतीश चव्हाण यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

या अधिवेशनात देशभरातून 300 च्या वर पदाधिकारी उपस्थित राहणार असून या अधिवेशनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मराठा - कुणबी बांधवांना कुर्मी भूषण पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार असल्याचे महासभेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील यांनी सांगितले. 

तर छत्रपती संभाजीनगर येथील रवींद्रनाथ टागोर सभागृह, देवगिरी महाविद्यालय येथे कुर्मी महासभेचे राज्य अधिवेशन पार पडणार असून या अधिवेशनासाठी मराठा - कुणबी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक व पूर्वी महासभेचे प्रदेश महासचिव जयेश शेलार  यांनी केले आहे. 

देशपातळीवर कुर्मी मधील समाज बांधवांचे शिक्षण, शेती, उद्योग, व्यापार, अर्थकारण मजबुत करण्यासाठी आपल्या सर्वांना एकञीत घेवून अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभा काम करीत आहे. छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्य अधिवेशनामध्ये या सर्व विषयांच्या अनुषंगाने समाजाच्या सर्वांगीण उन्नतीच्या दृष्टीने करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

गुरुपुत्र गुरुवर्य उमेश महाराज शेडगे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार !

गुरुपुत्र गुरुवर्य उमेश महाराज शेडगे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार ! मुंबई (शांताराम गुडेकर) :            परमपूज्य श्री स...