Wednesday 2 October 2024

गुरुपुत्र गुरुवर्य उमेश महाराज शेडगे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार !

गुरुपुत्र गुरुवर्य उमेश महाराज शेडगे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार !

मुंबई (शांताराम गुडेकर) :

           परमपूज्य श्री समर्थ सद्गुरु सिताराम स्वामी शेडगेबाबा यांनी घाटकोपर येथील काजरोळकर सोसायटीमध्ये परमपूज्य श्री समर्थ सद्गुरु सिताराम स्वामी भक्तीधाम सेवाश्रमची स्थापना केली त्यांच्या माध्यमातून खूप असे समाजकार्य होत असते. शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, व्यसनमुक्ती, प्रवचनकार, कीर्तनकार हे बाबांनी घडवले. तसेच बाबांच्या हातून अनेक असे शिष्यगण घडले की त्यांनी आपलं महाड पोलादपूर रायगड नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्र मध्ये बाबांचं नाव उज्वल केलं तीच परंपरा त्यांचे पुत्र गुरुवर्य उमेश महाराज शेडगे जपत आहेत हेच कार्य पाहून त्यांना 2024 चा आदर्श रायगड वृत्तपत्र व वृत्तवाहिनीचा आदर्श रायगड राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच गुरुपुत्र गुरुवर्य उमेश महाराज शेडगे यांच्या हस्ते अनेक मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान देखील करण्यात आला. ह भ प श्री रामचंद्र महाराज रिंगे. (भजनमूर्ती), ह भ प सुनील महाराज मेस्त्री (गुरुजी), ह भ प अंकुश महाराज कुमठेकर ( गायनाचार्य ) यांचा अंबरनाथ पूर्व येथील वीर बाजीप्रभू देशपांडे पंथ स्वामी समर्थ मंगल कार्यालय येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला आदर्श रायगड वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित सामाजिक शैक्षणिक क्रीडा पत्रकारिता साहित्य क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्यांना गौरवण्यात आले.

No comments:

Post a Comment

गुरुपुत्र गुरुवर्य उमेश महाराज शेडगे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार !

गुरुपुत्र गुरुवर्य उमेश महाराज शेडगे यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार ! मुंबई (शांताराम गुडेकर) :            परमपूज्य श्री स...