Monday 7 October 2024

गरीब गरजू परीतक्त्या महिलांना मिळणार दसरा दिवाळीनिमित्त मोफत गॅस सिलेंडर !!

गरीब गरजू परीतक्त्या महिलांना मिळणार दसरा दिवाळीनिमित्त मोफत गॅस सिलेंडर !!

*काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ पातकर यांची घोषणा*

कल्याण, संदीप शेंडगे : भाजपला रामराम ठोकून नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते राजाभाऊ पातकर यांच्याकडून दसरा दिवाळी सणा निमित्त गरीब गरजू  व परितक्त्या महिलांना राजाभाऊ पातकर फाउंडेशन आणि काँग्रेस पक्षातर्फे मोफत गॅस सिलेंडर मिळणार अशी घोषणा त्यांनी कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, मुन्ना तिवारी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत माहिती दिली.

प्रचंड वाढलेली महागाई दिवसेंदिवस वाढत चाललेली बेकारी बेरोजगारी ज्यामुळे सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल सुरू आहेत त्यातच गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडले असून सर्वसामान्य गरीब जनतेला गॅस सिलेंडर घेणे परवडत नाही.
गरीब परीतक्त्या महिलांना आपल्या भावाकडून एक दिलासा मिळावा या प्रांजळ भूमिकेतून राजाभाऊ पातकर यांनी लाडक्या बहिणीचा लाडका राजाभाऊ या नावाची योजना घोषित करून गोरगरीब महिलांना एक दिलासा दिला आहे.
कल्याण पश्चिम मतदार संघात ही योजना राबविण्यात येणार असून कल्याण मोहना टिटवाळा विभागात काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत ही योजना राबविण्यात येणार असून या योजनेच्या माध्यमातून  हजारो महिलांना दिलासा मिळणार आहे.

या अगोदरच राज्य सरकारने वर्षभरात तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची घोषणा केली असली तरी अद्याप ते गॅस सिलेंडर कोणत्या महिन्यात मिळणार हे गुलदस्त्यात आहे. राजाभाऊ पातकर यांनी काँग्रेस पक्षातर्फे दसरा दिवाळी सणानिमित्त हजारो बहिणींना दिवाळी भेट दिली असल्याची भावना काँग्रेसचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी व्यक्त केली. 

या योजनेच्या माहिती बाबत राजाभाऊ पातकर यांना विचारले असता मला लहानपणापासूनच समाजकार्याची आवड आहे मी गरिबी जवळून पाहिली आहे. कोरोना काळात मी स्वतःचे हॉटेल बंद करून टिटवाळ्यात सर्व नागरिकांकरिता मोफत काँरनटाईन सेंटर सुरू केले होते तसेच आपल्या दवाखान्यामार्फत अनेक गोरगरिब रुग्णांची सेवा केली आहे अनेक शिबिरे राबविले असून मोफत नेत्र तपासणी मोफत शस्त्रक्रिया मोफत आरोग्य शिबीर मी राबविले आहेत. 
एक भाऊ म्हणून या दसरा दिवाळीनिमित्त महिलांना  माझ्याकडून छोटीशी भेट देत आहे.

No comments:

Post a Comment

संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २६९ निरंकारी भक्तांचे रक्तदान !!

संत निरंकारी मिशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात २६९ निरंकारी भक्तांचे रक्तदान !! ** मानवतेला समर्पित भावनेतून निरंकारी मिशनतर्फे कोथरूड य...