Sunday, 27 October 2024

श्री. स्वामी समर्थ प्रतिष्ठान, ठाणे तर्फे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना कपडे व फराळाचे वाटप‌ !

श्री. स्वामी समर्थ प्रतिष्ठान, ठाणे तर्फे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना कपडे व फराळाचे वाटप‌ !

ठाणे , प्रतिनिधी : दिवाळीच्या पूर्व संध्याला दीपोत्सव २०२४  उपक्रमा अंतर्गत श्री. स्वामी समर्थ प्रतिष्ठान, ठाणे तर्फे पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना नवीन कपडे आणि फराळ वाटप करण्यात आले. ही मुले ठाण्यातील प्रसिद्ध व ब्रिटिश कालीन कळवा व ठाणे शहराला जोडणारा पूल जो १५० वर्षा पूर्वी बांधण्यात आला. त्या पूला खाली वसविण्यात आलेली वस्ती ज्या वस्तीत मुलांना ग्राउंड नाही, शिक्षण नाही त्यातून उन्नतीचे ध्येय गाठण्याचे ध्येय बाळगणाऱ्या मुलांना संस्थे तर्फे दरवर्षी फराळ नवीन कपडे, मुलांची वार्षिक फी, मुलांचे शैक्षणिक वर्ग त्यातून गाणी, शैक्षणिक साहित्य असे अनेक उप्रकम आपण करीत असतो. 

सदरप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे श्री. निखिल बुडजडे, ड्रिमलँड रिऍलिटी कंपनीचे सर्वेसर्वा श्री. दिपक मोरे, विद्या मोरे, श्री. स्वामी समर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. रुपेश शिंदे, पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळेतील  मुख्याध्यापक अमोल पाटील, आरती गाढवे, पूनम सावंत, पल्लवी लंके, राजेंद्र गोसावी, किशोर म्हात्रे, अजय भोसले, उत्कर्षां पाटील, मंगेश निकम, निशांत कोळी, शुभम कांबळे तसेच हितचिंतक माजी शिक्षक गणेश पाटील  इत्यादी सदस्य उपस्थित होते. सदर प्रसंगी शाळेतील ५० विद्यार्थ्यांना नवीन कपडे आणि फराळ वाटप करण्यात आले अशी माहिती संस्थेचे सदस्य अजय भोसले यांनी दिली.

No comments:

Post a Comment

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !!

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !! पेण, (पंकजकुमार पाटील) - खारेपाट भागातील विठ्ठल नगर या गावात दरवर्षी प्रमाणे नाथस...