Saturday, 26 October 2024

निवडणुकीसाठी कुणबी समाजाचा वापर करून घेणाऱ्यांचे पितळ आता उघडे पडले - केतन भोज

निवडणुकीसाठी कुणबी समाजाचा वापर करून घेणाऱ्यांचे पितळ आता उघडे पडले - केतन भोज

लांजा,( प्रतिनिधी) - मागील २०१९ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत लांजा - राजापूर - साखरपा या मतदार संघात कुणबी समाजाने आपला उमेदवार म्हणून समाजाने एका उमेदवार व्यक्तीला पाठिंबा दिला होता.तेव्हा कुणबी समाजांच्या मतदारांची लाट या मतदारसंघात दिसत होती.पण त्या विधानसभा मतदार संघात निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवाराने फक्त कुणबी समाजाला भावनिक करून त्यांचा फक्त वापरून करून घेतला.आणि त्या उमेदवाराने कुणबी समाजाला गृहीत धरून समाजाला नंतर पाठ दाखवली.तरी यंदाच्या होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कुणबी समाजाने भावनिक न होता विकास डोळ्यापुढे ठेवून योग्य उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन केतन भोज यांनी केले आहे.आणि कुणबी  समजाचा उमेदवार म्हणून कोण घेत असेल आणि त्याच भांडवल करून कुणबी समाजाचा वापर आपल्या स्वार्थी राजकारणासाठी करत असेल तर या विधानसभेच्या निवडणुकीत अशा लोकांना कुणबी समाजाने मतदार पेटीतून त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी. असे मत केतन भोज यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी !!

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी !! ** ३१ तास चाललेल्या पालखी सोहळ्यात ग्रामस्थांनी देवीचे शांततेत दर्शन घेत हजारो भाव...